संभाजी भिडे म्हणाले, ‘मराठ्यांनी देश सांभाळावा, आरक्षण कुठे मागता?’, मनोज जरांगे म्हणाले….

संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन विरोधकांकडून निशाणा साधला जातोय. मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही, असंच संभाजी भिडे अप्रत्यक्षपणे म्हणाले आहेत. त्यांच्या वक्तव्यावर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

संभाजी भिडे म्हणाले, 'मराठ्यांनी देश सांभाळावा, आरक्षण कुठे मागता?', मनोज जरांगे म्हणाले....
संभाजी भिडे आणि मनोज जरांगे पाटील
Follow us
| Updated on: Aug 18, 2024 | 6:57 PM

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणाबद्दल वेगळी भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही, असंच संभाजी भिडे यांनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवलं आहे. त्यामुळे संभाजी भिडे यांच्यावर विरोधकांकडून निशाणा साधला जातोय. संभाजी भिडे यांनी आज सांगलीत पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणावर भूमिका मांडली. त्यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर आता विरोधकांकडून टीका केली जात आहे. संभाजी भिडे यांच्या भूमिकेवर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला.

“लय बेस्ट. वाघ मागत नसतो. शिकार करून घेत असतो. त्यांना बोलून काही उपयोग नाही. त्यांना दोष देऊन सुद्धा उपयोग नाही. त्यांची चूक असण्याचे कारण ही नाही. जे भिडे गुरुजी बोलले ते शब्द देवेंद्र फडणवीस यांचे आहेत. आता भिडे गुरुजी तसं म्हणत असतील तर त्यांच्यापासूनही मराठे दूर जातील आणि हे देवेंद्र फडणवीस यांचे काम आहे”, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

‘फडणीसांनी ज्यांना बोलायला लावलं त्यांच्यापासून समाज दूर गेला’

“देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना-ज्यांना बोलायला लावले तर त्यांच्यापासून मराठा समाज दूर गेला आणि भिडे गुरुजींसोबत ही मराठ्यांची पोरं आहेत आणि ते आता लांब जातील. देवेंद्र फडणवीस म्हणजे स्वतःला संपवायला लागला आणि त्यांचे नेतेही संपवत आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. भिडे गुरुजी बोलले ते शब्द देवेंद्र फडणवीस यांचे आहेत आणि हा फडणवीस यांचा सहावा ते सातवा डाव आहे”, असा आरोपदेखील मनोज जरांगे पाटील यांनी केला.

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?

“मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठे मागता? सिंहानी जंगल सांभाळायचे असते. मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालविणारी जात आहे, हे मराठ्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल, त्यादिवशी या मातृभूमीचे भाग्य उजळून जाईल. हे त्यांच्या लक्षात येत नाही, हे आपले दुर्दैव आहे”, असं संभाजी भिडे म्हणाले आहेत.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.