डोळ्यांमध्ये अश्रू, शब्दांमधून आक्रोश, पत्रकार परिषदेत मनोज जरांगे प्रचंड भावूक

मनोज जरांगे पाटील यांनी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपण कोणकोणत्या मतदारसंघातून उमेदवार उतरवणार याबाबत माहिती दिली. तसेच लवकरच उमेदवारांची घोषणा करु, असंदेखील जरांगे यांनी सांगितली. यावेळी मनोज जरांगे प्रचंड भावूक झाले. मनोज जरांगे यांच्या कापरा आवाजातील प्रत्येक बोल हे मराठा आंदोलकांच्या मनाला टोचत होता. जरांगे यांचं भावूक होणं, त्यांच्या शब्दांमधून आक्रोश व्यक्त करणं यामुळे तिथलं वातावरणच भावूक झालं. जरांगे यांनी यावेळी आपल्या सर्व समर्थकांना अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं आवाहन केलं.

डोळ्यांमध्ये अश्रू, शब्दांमधून आक्रोश, पत्रकार परिषदेत मनोज जरांगे प्रचंड भावूक
मनोज जरांगे पाटील
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 12:01 AM

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची आज सकाळपासून त्यांच्या समर्थक आणि मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरु आहे. मनोज जरांगे यांच्या आदेशानुसार त्यांच्या अनेक समर्थकांनी वेगवेगळ्या मतदारसंघांमधून अर्ज भरले आहेत. विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची आज दिवसभर बैठक चालली. यानंतर त्यांनी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उमेदवारांची घोषणा केली नाही. पण कोणकोणत्या मतदारसंघातून उमेदवार उतरवणार याबाबतची घोषणा केली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाले. ते भूमिका मांडत असताना भावूक झाले. त्यांच्या प्रत्येक शब्दाने तिथे उपस्थित मराठा आंदोलकांनादेखील भावूक केलं.

“तुम्ही जितकं नेत्याचं ऐकून द्वेषाचं काम करायचा प्रयत्न करतात, तितकं तुम्ही समाजाला दु:खात डुबवायला लागला आहात. हा समाज बलशाली बनवायचा आहे. त्यासाठी ज्यांनी आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, लेकरांचं भविष्य फोडलं, आमच्या लेकरांची मान कापण्याचा प्रयत्न केला, माझ्या समाजाला हिणवलं, हिन वागणूक दिली, टार्गेट केलं गेलं, त्या सत्ताधाऱ्यांनाही मी सोडणार नाही. कारण त्यांच्या इतक्या वेदना उभ्या आयुष्यात माझ्या समाजाला कुणी दिल्या नसतील. माझा समाज माझ्यासाठी मोठा आहे. त्या समाजाला संपविणाऱ्याला मी संपविल्याशिवाय शांत राहणार नाही”, असं म्हणत मनोज जरांगे भावूक झाले.

भावूक होवून मनोज जरांगे काय म्हणाले?

“जिथे ताकद नाही तिथे पाडणार आहोत. मला या प्रवाहात यायचं नव्हतं. राजकारण माझा पिंड नाही. पण या हरामखोरांनी माझ्या समाजाला एवढं दु:ख दिलं, आज खूप पोरांवर केसेस झाल्या आहेत, माझ्या समाजाचं बलिदान गेलं आहे. त्या आईच्या कपाळावर कुंकूच नाही. ते बघताना एवढा कासाविस जीव होतो की, असं वाटतं मराठाच्या पोटी जन्म घेऊन आपण काहीच करु शकत नाही. एवढा मोठा बलाढ्य समाज आहे, आणि आईच्या डोळ्यांतील पाणी थांबत नाही, तिला ना नवरा दिसत नाही, छोटे-छोटे लेकरं घेऊन जायचे कुठे? हे सरकार आमची इतकी चेष्टा करतंय, आमचा मराठा समाज 15 महिन्यांपासून रस्त्यावर आहे, माझ्या समाजावर खुन्नस देऊन आरक्षणच देत नाहीत, मी मराठा समाजाचा खांदानी पोरगं आहे तर मी का बदला घेऊ नये?” , असा सवाल जरांगेंनी केला.

हे सुद्धा वाचा

(हेही वाचा : अखेर मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा, कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवार?)

‘रक्ताच्या थारोळ्यात भिजलेल्या आईला…’

“आई-बापाला त्रास दिल्यावर त्यांचं पोरगं शांत बसणार नाही. ते शिव्यासुद्धा देणार. तसाच माझा जीव कासावीस होतो. माझ्या आई-बहीणीच्या डोक्यात गोळ्या घातल्या. रक्ताच्या थारोळ्यात भिजलेल्या आईला दवाखानात न्यायचं होतं. पण कुणी नव्हतं. खरंच खानदानी पोरगं आहे. मी बदला घेणार. माझ्या रक्तात भेसळ नाही. मी नेत्यासाठी आणि पक्षासाठी भेसळसारखं राहू शकत नाही. मी मर्दासारखं एक दिवस जगणार आणि माझ्या आई-बहिणीचा आणि माझ्या समाजाला दिलेल्या त्रासाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही”, असा एल्गार मनोज जरांगे यांनी केला.

‘माझं कुटुंब सुद्धा कुठे आहे ते मला माहिती नाही’

“मला जगण्यात स्वारस्य नाही. माझ्या समाजाला इतका त्रास दिलाय, एवढा अन्याय केलाय की, इतका अन्याय कुणी केला नसेल. इतकी घोर फसवणूक आमची या जगात कुणी केली नसेल. मी माझं कुटुंब बाजूला सारुन जीवाच्या कोणत्याच वेदनेचा विचार न करता मी या समाजासाठी झुंजायला तयार झालो. मी माझ्या समाजाचा बदला घेणार तेव्हाच मरणार. माझा हा समाज एकरुप राहावा, माझ्या समाजाचं बळ वाढावं म्हणून माझं कुटुंब सुद्धा कुठे आहे ते मला माहिती नाही”, असं म्हणत जरांगे पुन्हा भावूक झाले.

‘माझं आयुष्य सैरावैरा झालं, मात्र…’

“माझे लेकरं कुठे आहेत ते मला माहिती नाही. माझा बाप कुठे मी कुठे आहे? एखाद्या हरणाच्या कळप्यातील एखादं हरण हरवावं आणि त्या आईला हरणाचं पिल्लू न सापडावं असं सैरावैरा माझं आयुष्य झालं आहे. मला मात्र माझ्या समाजाला मोठं करायचं आहे. मी माझ्या कुटुंबाचं सुख नाही बघू शकत. मला माझ्या समाजाचं सुख बघायचं आहे. माझ्या समाजाला संपवायला निघालेल्या सरकारला पायाखाली तुडवल्याशिवाय तुम्ही सुद्धा राहू नका. तुम्हाला समाजाची शपथ आहे. पक्ष आणि नेता याला उडत लावा. पण माझ्या समाजाला वेदना देणाऱ्याच्या चिंधळ्या चिंधळ्या केल्याशिवाय सोडू नका”, असं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलं.

'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?.
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग...
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग....
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.