Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil | ‘गिरीश महाजन संकटमोचक, त्यांनी माझं आयुष्य वाढवलं’, मनोज जरांगे यांच्याकडून तोंडभरुन कौतुक

राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या मनधरणीसाठी अंतरवली सराटे गावात दाखल झालं. त्यांनी मनोज जरांगे यांना समजवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. पण जरांगे उपोषणावर ठाम आहेत. या दरम्यान जरांगे यांनी गिरीश महाजन यांचं कौतुक केलं.

Manoj Jarange Patil | 'गिरीश महाजन संकटमोचक, त्यांनी माझं आयुष्य वाढवलं', मनोज जरांगे यांच्याकडून तोंडभरुन कौतुक
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 8:02 PM

जालना | 5 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज अंतरवली सराटे गावात गेलं. यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे, शिवसेना नेते संदिपान भुमरे, अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. गिरीश महाजन यांनी आरक्षणासाठी 1 महिन्याचा कालावधी वाढवून मागितला. पण मनोज जरांगे उपोषणाच्या भूमिकेवर ठाम राहिले. याउलट त्यांनी राज्य सरकारला चार दिवसांची आणखी मुदत दिली. यावेळी त्यांनी गिरीश महाजन यांचं कौतुक केलं.

“मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे. तुम्ही मला आरक्षण द्या. आमचा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचणार. मी सगळ्या पत्रकारांना सांगितलं होतं की, आरक्षणाचा आज जीआर आला नाही तर आजपासून पाणी पिणं बंद आणि औषध सुद्धा बंद. पण तुम्ही आलात म्हणून पुढचे चार दिवसही घेतो”, असं आश्वासन मनोज जरांगे यांनी दिलं.

‘तुम्ही आम्हाला पॉझिटिव्हच केलं, नाहीतर…’

“आमच्या लेकराचं वाटोळं होत आहे. दुसरं काही असतं तर सोडून दिलं असतं. इथे माझ्या जातीचा जीवन-मरणाचा विषय आहे. मी माझ्या समाजाला विषाच्या खाईत लोटू शकत नाही. तुम्ही आम्हाला पॉझिटिव्हच केलं. नाहीतर पॉझिटिव्ह नव्हतं. खरंच लोकं जे बोलतात ते खरंच आहे. संकटमोचक जे म्हणतात ते खरंच आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले.

‘हे आमच्यासाठी खूप मोठे दिवस’

“कुणी तिकीट घेण्यासाठी स्तुती करेल, कुणी निधी घेण्यासाठी स्तुती करेल. पण मी खरंच मनापासून स्तुती केली. माझा एक स्वभाव आहे, स्तुती करायची नाही. खरंच ते संकटमोचक आहेत. आम्हाला आज चार दिवस वाढवून दिले. हे आमच्यासाठी खूप मोठे दिवस आहेत”, असं जरांगे म्हणाले.

“हे स्वयंसेवक सांभाळायचं, हे आंदोलन सांभाळायचं, त्यामध्ये स्वत:ची बॉडी सांभाळायची. त्याच आणखी तुम्ही दोन गोष्टी देवून बसलेत. सलाईन लावतोय आणि पाणीही पितोय. तुमचं एक इंजेक्शन असं आहे की, 15 दिवस भूक लागत नाही. माझं नुसतं ढोपर दुखत होतं. डॉक्टर म्हणाले, याला पालथं पाडा. इंजेक्शन टोचलं, म्हणाले, तीन मिनिटात गप्प होईल, अडीच मिनिटात गप्प झालो. मी खरं बोलतोय. अडीच मिनिटात माझी चमक चांगली झाली”, असं मनोज जरांगे म्हणाले.

‘तुम्ही खरंच संकटमोचक’

“तुम्ही खरंच संकटमोचक आहात. तुम्ही वेळ वाढवला. काय जादुई शक्ती आहे. मी सगळं व्यवस्थित करतो, व्यवस्थित सांगतो. पहिले आपल्या बैठका घेतो. मी इथे बसतो. तुम्हाला जे करायचं ते करा. तुम्ही चांगला निर्णय घेतला. न होणारी घटना केली. सलाईन लावलं, पाणी पिलं. माझं आणखी आयुष्य वाढलं”, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी गिरीश महाजन यांची स्तुती केली.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.