मिस्टर जरांगे, तुम्ही मराठ्यांचं वाटोळं करु नका, लक्ष्मण हाके म्हणाले एका टक्क्यात…, ओबीसी नेत्यांनाही सोडलं नाही, अशी केली आगपाखड

Laxman Hake Attack On Manoj Jarange Patil : अंतरवाली सराटी आणि वडीगोद्रीत सध्या आंदोलन तीव्र झाले आहे. आज अचानक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली. यापूर्वी गेल्या आठवड्यात त्यांची अशीच अवस्था झाली होती. त्यामुळे आंदोलकांमध्ये चिंता वाढली आहे .

मिस्टर जरांगे, तुम्ही मराठ्यांचं वाटोळं करु नका, लक्ष्मण हाके म्हणाले एका टक्क्यात..., ओबीसी नेत्यांनाही सोडलं नाही, अशी केली आगपाखड
लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचा ओबीसी नेत्यांना घरचा आहेर
Follow us
| Updated on: Sep 24, 2024 | 4:24 PM

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी आणि वडीगोद्रीत मराठा आंदोलन आणि ओबीसी आंदोलनाने वातावरण तापलेले आहे. दुसरीकडे पंढरपूर येथे धनगर समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. त्यामुळे राज्य ढवळून निघाले आहे. आज दुपारी अचानक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती. उपोषण सोडण्यासाठी महिलांसह इतर आंदोलकांनी आग्रही मागणी केली. दरम्यान, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छत्रपती संभाजीराजे आणि जरांगे पाटील यांच्यावर टीका केली.

कोण राजरत्न? मी त्यांना ओळखत नाही

वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आज सहावा दिवस आहे. एकही अधिकारी इकडे फिरकला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मी राजरत्न आंबेडकर यांना ओळखत नाही. आम्ही प्रकाश आंबेडकर , आठवले यांना ओळखतो, असा चिमटा त्यांनी काढला. राजरत्न आंबेडकर यांनी चर्चेला यावे, ते कोण आहेत, कुठे राहतात याची माहिती द्यावी. राजरत्न यांनी आंबेडकर नाव लावू नये, असे आवाहन त्यांनी केले.

हे सुद्धा वाचा

संभाजी राजे छत्रपती यांना एकरी भाषेत बोललो नाही फक्त मी मिस्टर संभाजी भोसले म्हणालो. स्वराज्य संघटना आम्हाला काय गोळ्या घालणार आहेत का. मी तिथेच आहात आम्ही कुठेही फिरतो त्यांनी यावा आम्हाला गोळ्या घालावा. अंतरवाली सराटीचा रस्ता आम्ही अडवला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अडवला आहे. जरांगे यांनी मुख्यमंत्र्याला बोलावं, असे ते म्हणाले.

एका टक्क्यात काय काय घेणार?

मिस्टर जरांगे तुम्ही ओबीसी मध्ये येऊन एक टक्क्यात काय काय घेणार आहात? मराठ्यांचे वाटोळे करू नका, अशी टीका त्यांनी केली. निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार यांना मुद्दा उरलेला नाही हे त्यांचे अपयश आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे हे मुद्दे उरले नाहीत. म्हणून जाती जातीत असे मुद्दे उतरून लोकात भ्रम तयार करत आहेत. धनगर आरक्षण डिक्लेअर करा आणि मग आम्ही ओबीसीच्या आरक्षणाबद्दल निर्णय घेऊ. जरांगे आणि शरद पवार तुम्ही तयारी आहे का? असा सवाल त्यांनी केला.

ओबीसी नेत्यांवर टीका

मराठ्यांनी मराठ्यांसाठी चालवलेले राज्य या राज्यात ओबीसीला इज्जत नाही. ओबीसीला धक्का कसा लागणार नाही एकदा सरकारने आम्हाला सांगावं चर्चा करायला आम्ही तयार आहोत. राजरत्न तुला आमदार व्हायचं का? तू का शरद पवारांचा माणूस आहेस का? मी राज रतनला मानत नाही. तू कोण आहेस मला माहित नाही. ओबीसी नेत्यांनो आता तरी ये क्या आपल्या मताची ताकद मराठ्यांना दिसू द्या. अन्यथा हे लोक तुम्हाला सळोकीपोळ करून सोडतील, असे हाके म्हणाले. साध्य निवडणूक जवळ आल्याने सगळे नेते त्याच्या दबावाला बळी पडले की काय ?त्यामुळे ओबीसी नेते इथे आले तरी ठीक नाही आले तरी ठीक,ओबीसींचे नेते त्यांच्या दबावाला बळी पडले असतील, अशी टीका नवनाथ वाघमारे यांनी केली.

'राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील', 'त्या' टीकेवरून गोगावलेंचा हल्लाबोल
'राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील', 'त्या' टीकेवरून गोगावलेंचा हल्लाबोल.
आनंदाची बातमी, लवकरच प्रवाशांच्या सेवेत मुंबई मेट्रो 3 दाखल होणार
आनंदाची बातमी, लवकरच प्रवाशांच्या सेवेत मुंबई मेट्रो 3 दाखल होणार.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले, 'गोळ्या घालण्यापेक्षा..'
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले, 'गोळ्या घालण्यापेक्षा..'.
लाभार्थी होण्यासाठी 'बहिणीं'चे मोठे हाल, रात्रभर बँकेच्या बाहेर उभ्या
लाभार्थी होण्यासाठी 'बहिणीं'चे मोठे हाल, रात्रभर बँकेच्या बाहेर उभ्या.
देशभरात पहिल्या क्रमांकावर 'देवाचा न्याय'... ट्विटरवर का होतोय ट्रेंड?
देशभरात पहिल्या क्रमांकावर 'देवाचा न्याय'... ट्विटरवर का होतोय ट्रेंड?.
जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी पिण्यास नकार; महिलांना अश्रू अनावर
जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी पिण्यास नकार; महिलांना अश्रू अनावर.
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरं? व्हिडीओ होतेय व्हायरल
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरं? व्हिडीओ होतेय व्हायरल.
राऊत मूर्ख-बेताल, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरील टीकेवर शिरसाट भडकले
राऊत मूर्ख-बेताल, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरील टीकेवर शिरसाट भडकले.
आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर..; संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार
आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर..; संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार.
जलील यांच्या रॅलीवर राणेंचा टोला, '...इतकं आम्ही रोज नाश्त्याला खातो'
जलील यांच्या रॅलीवर राणेंचा टोला, '...इतकं आम्ही रोज नाश्त्याला खातो'.