AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा; अशोक चव्हाण यांची नेमकी प्रतिक्रिया काय?

बाळासाहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. शिवाय ते अतिशय संयमी आहेत. नेमकं काय घडलं याची माहिती घ्यावी लागले, असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा; अशोक चव्हाण यांची नेमकी प्रतिक्रिया काय?
अशोक चव्हाण Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 3:34 PM

जालना : सत्यजित तांबे यांच्या प्रकरणापासून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यात वाद निर्माण झाला. बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित तांबे यांची बाजू लावून धरली. महिनाभरानंतर त्यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्षांवर नाराजी व्यक्त केली. त्यासंदर्भात पत्र बाळासाहेब थोरात यांनी हायकमांडकडं पाठविल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला. यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले, आम्हाला आताचं कळालं. आम्हीसुद्धा पुण्याहून कैलास गोरंटेवारच्या घरी जे लग्न आहे त्यासाठी आलो आहे. येथे आल्यानंतर ही बातमी कानावर आली.

थोरात संयमी आणि ज्येष्ठ नेते

बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा ही दुर्दैवी बाब आहे. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ आणि संयमी नेते आहेत. त्यामुळं यामागचं कारण हे समजल्याशिवाय प्रतिक्रिया देणं उचित नाही. बाळासाहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. शिवाय ते अतिशय संयमी आहेत. नेमकं काय घडलं याची माहिती घ्यावी लागले, असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

त्यांनी या पदाचा दिला राजीनामा

अशोक चव्हाण म्हणाले, सकाळी आज मी बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यासाठी सकाळी दहाच्या सुमारास त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण, त्यांनी विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्याची माहिती नव्हती.

महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी येणार

महाराष्ट्राचे प्रभारी हा वाद मिटविण्यासाठी महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. पक्ष मजबूत होण्यासाठी जे-जे करावं लागेल ते मी आणि विश्वजित कदम आम्ही दोघेही मिळून करू, असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

असा सुरू झाला वाद

यापूर्वी बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष होते. त्यांच्याकडून पदभार काढून नाना पटोले यांना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्षपद देण्यात आले. त्यानंतर काँग्रेसमधील एक गट नाराज झाला होता. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून पुन्हा नाराजी उफाळून आली.

सत्यजित तांबे यांना भाजपने पाठिंबा दिला. ते निवडूनही आले. पण, सत्यजित तांबे आणि बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त केली. आता हा वाद मिटविण्यात काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी कितीपत यशस्वी ठरतात, हे येत्या काही दिवसात दिसणार आहे. तोपर्यंत काँग्रेसमध्ये काय हालचाली घडतात हे पाहावं लागेल.

महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.