24 डिसेंबरनंतर मराठा आंदोलनाची काय दिशा असणार? मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितंल, म्हणाले…

Manoj Jaranage Patil : मनोज जरांगे यांनी आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेत वेळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी केली होती. जरांगे यांनी यावर आपली काय प्रतिक्रिया दिली जाणून घ्या.

24 डिसेंबरनंतर मराठा आंदोलनाची काय दिशा असणार? मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितंल, म्हणाले...
मनोज जरांगे
Follow us
| Updated on: Dec 17, 2023 | 11:31 AM

जालना :राठा आरक्षणाचा  विषय आणखीनच चिघळत चालला असल्याचं दिसत आहे. मनोज जरांगे यांची सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. सरकारकडून मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगरमधील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये जरांगे यांची भेटत अल्टिमेटमबाबत विचार करावा असं म्हटलं होतं. २४ डिसेंबरच्या अल्टिमेटमचा परत एकदा विचार करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली होती. त्यामुळे यावर जरांगे सरकारला वेळ वाढवून देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

मनोज जरांगे काय म्हणाले?

आम्हाला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण पाहिजे. सरकार आरक्षण देईलच, नाही दिलं तरी आम्ही लढायला सज्ज आहोत. परंतु त्यांना जो 24 डिसेंबपर्यंतचा जो त्यांना वेळ दिलेला आहे. त्यातला एक घंटाही कमी होणार नाही आणि नाही पण त्यांनी वेळ वाढवून मागितलेली आहे. वेळ नाही नाही मी कालच सांगितलं आणि हे मीडियाच्या बांधवाच्या समोर सांगितलं असून मी आडून मी चर्चा करत नाही,  असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजच्या लेकरांच्या हिताचा आज निर्णय होणार आहे. आमच्या नोंदी असताना आम्हाला का आरक्षण देत नाही, सरकार का वेठीस धरत आहे. आज 3 वाजेपर्यंत निर्णय होणार आहे, नोंदीच्या आधारे निर्णय घ्यावा. मराठा समाजाच्या नोंदी मिळल्या आहेत आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाला त्या आधारे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत असल्याचंही जरागेंनी सांगितलं.

मी त्यांना सांगितलं, जे उपोषण सोडताना आले होते. त्यावेळी जे कागदावरती लिहिलं होतं, ते फक्त तुम्ही एकदा वाचा. तुम्ही ते वाचलं की तुम्हाला वेळ मागायची गरजच पडणार नाही. कारण तुमच्या हातात आणखीन आठ- दहा दिवस आहेत. त्यामुले तुम्हाला वेळ मागायची गरज पडणार नसल्याचं जरांगे म्हणाले.

दरम्यान, आता हा शेवटचा लढा आहे त्यामुळं लढूनच आरक्षण मिळवायचं आहे. दमायचा नाही पर्फेक्ट नियोजन काय जे करायचंय ते नियोजनबद्ध निर्णायक ठोस ठरवून चांगली बांधणी करणार असल्याचं जरागेंनी सांगितलं. मराठा संघटना आणि जरांगे यांच्यात 12 ते 3 अशा तीन तास बैठक चालणार आहे यामध्ये  काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.