Jamner Assembly Elections 2024: शरद पवार, एकनाथ खडसेंची खेळी, एकतर्फी विजय मिळवणाऱ्या गिरीश महाजनांसमोर तगडे आव्हान, मनोज जरांगेंची मिळणार साथ

Jamner Assembly Elections Details: विकासाची कामे जामनेर विधासभा मतदार संघात झालीच आहे. परंतु मतदार संघातील कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्याच्या समस्येबाबत गिरीश महाजन धावून गेले आहेत. त्यासाठी त्यांची खास टीम नेहमी कार्यरत राहिली आहे. जळगावपासून मुंबईपर्यंत रुग्णांना त्यांनी मदत केली आहे. परंतु यंदा मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

Jamner Assembly Elections 2024: शरद पवार, एकनाथ खडसेंची खेळी, एकतर्फी विजय मिळवणाऱ्या गिरीश महाजनांसमोर तगडे आव्हान, मनोज जरांगेंची मिळणार साथ
Follow us
| Updated on: Oct 22, 2024 | 9:40 AM

Jamner Assembly Elections Details: भाजपचे ‘संकटमोचक’ म्हणून ओळख असलेले, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा उजवा हात समजले जाणारे, कधीकाळी पक्षात असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याशी पंगा घेणारे गिरीश महाजन यांना पुन्हा भाजपने जामनेर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसच्या गड असलेल्या या मतदार संघात गिरीश महाजन यांनी 1995 मध्ये पहिल्यांदा कमळ फुलवला. त्यानंतर मतदार संघात त्यांच्या गुर्जर समाजाची संख्या कमी असताना केवळ लोकांशी असलेल्या थेट जनसंपर्कामुळे गिरीश महाजन सलग सहा वेळा आमदार झाले. परंतु सातव्यांदा आमदार होणे त्यांच्यासाठी सोपे नाही. मतदार संघातील गणिते बदलली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील गिरीश महाजन यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहेत. त्यासाठीच त्यांनी भाजपमध्ये गिरीश महाजन यांच्यासोबत काम करणारे मराठा समाजाचे दिलीप खोडपे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश दिला आहे. आता महाविकास आघाडीचे ते उमेदवार असण्याची शक्यता आहे. यामुळे ही निवडणूक आता एकतर्फी नाही तर रंगतदार होणार आहे.

असा आहे जामनेर मतदार संघ

जामनेर मतदारसंघ हा ग्रामीण मतदार संघ आहे. या भागातील लोकांचा शेती हा मूळ व्यवसाय आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघात जामनेर विधानसभा मतदार संघ येतो. 2011च्या जनगणनेनुसार जामनेर मतदार संघात 26,318 एससी मतदार आहेत. 33,487 एसटी मतदार आहेत. 39,104 मुस्लिम मतदार आहेत. ग्रामीण मतदारांची संख्या 2,73,295 आहे. शहरी मतदार 37,087 आहेत. म्हणजे जामनेर मतदार संघात ग्रामीण भागाचे वर्चस्व आहे. . 2011च्या जनगणनेनुसार जामनेर तालुक्यात 60 हजारांच्या जवळपास मराठा समाजाची लोकसंख्या आहे. त्याखालोखाल बंजारा, माळी, मुस्लीम तसेच मागासवर्गीय समाजाची लोकसंख्या आहे. गिरीश महाजन हे गुर्जर समाजाचे आहेत. जामनेर तालुक्‍यात गुर्जर समाजाची लोकसंख्या केवळ आठ ते दहा हजार इतकी आहे.

वर्ष उमेदवार पक्ष मते
2019 गिरीश दत्तात्रय महाजन भाजप 114714
2014 गिरीश दत्तात्रय महाजन भाजप 103498
2009 गिरीश दत्तात्रय महाजन भाजप 89040
2004 गिरीश दत्तात्रय महाजन भाजप 71813
1999 गिरीश दत्तात्रय महाजन भाजप 56416
1995 गिरीश दत्तात्रय महाजन भाजप 63661
1990 दत्तात्रय उघाडू महाजन काँग्रेस 31531
1985 बाबूसिंग डागडूसिंग राठोड काँग्रेस 29964
1980 ईश्वरलाल शंकरलाल जैन काँग्रेस (यू) 31068
1978 गजाननराव रघुनाथराव गरुड अपक्ष 15955
1972 नारायण किसन पाटील अपक्ष 26340
1967 अबाजी नाना पाटील
1972 अबाजी नाना पाटील

जामनेर मतदार संघावर राहिले काँग्रेसचे वर्चस्व, पण…

जामनेर मतदार संघावर कधीकाळी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. 1962 आणि 1967 अबाजी नाना पाटील हे या मतदार संघातून निवडून आले. त्यानंतर 1972 मध्ये नारायण किसन पाटील तर 1978 मध्ये गजाननराव गरुड निवडून आले. 1980 मध्ये काँग्रेस (यू) चे ईश्वरलाल जैन यांनी बाजी मारली. त्यानंतर 1985 मध्ये काँग्रेसचे बाबूसिंग राठोड, 1990 मध्ये दत्तात्रय उघडू महाजन निवडून आले. काँग्रेसचा अभद्य बालेकिल्ला असलेला जामनेर विधानसभा मतदारसंघात भाजपला पाय रोवने सोपे नव्हते. मग जामनेर ग्रामपंचायतीचे सरपंच आणि युवा नेते असलेल्या गिरीश महाजन यांच्यावर ही जबाबदारी टाकली. त्यानंतर 1995 मध्ये काँग्रेसच्या बालेकिल्यात गिरीश महाजन यांनी कमळ फुलवला. मग गिरीश महाजन यांनी या मतदार संघावर वर्चस्व निर्माण केले. तेव्हापासून हा किल्ला भाजपच्या ताब्यात आहे.

हे सुद्धा वाचा

गिरीश महाजन यांची राजकीय कारकीर्द

महाविद्यालयीन दशेतच गिरीश महाजन भाजपच्या संपर्कात आले. विद्यार्थी असताना 1978 मध्ये त्यांनी भाजपची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम सुरु केले. तळागाळातील कार्यकर्ता म्हणून त्यांनी भिंती रंगवल्या, प्रचाराचे पोस्टर वाटले. मग ते अभाविपचे तालुकाध्यक्ष झाले. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बनले. प्रत्यक्षात राजकारणात ते 1992 मध्ये आले. जामनेरच्या ग्रामपंचायत निवडून आले. त्यांना सरपंच करण्यात आले. त्यानंतर 1995 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. 1995 ते 2019 पर्यंत सलग सहा वेळा ते आमदार आहे.

एकनाथ खडसे यांच्याशी राजकीय वैर

एकनाथ खडसे हे भाजपचे राज्य पातळीचे नेते झाले होते. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी महाराष्ट्रात त्यांनी पक्ष वाढवला. गिरीश महाजन यांनीही तत्कालीन भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यासोबत काम सुरु केले. परंतु त्यानंतर राज्यात एकनाथ खडसे यांचे प्रस्थ वाढले. खडसे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान देऊ लागले. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असतानाही एकनाथ खडसे यांची एकाधिकारशाही होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांना रोखण्यासाठी गिरीश महाजन यांना पाठबळ देण्यास सुरुवात केली. पक्षात गिरीश महाजन यांचे प्रस्थ वाढले. देवेंद्र फडणवीस यांचा उजवा हात म्हणून गिरीश महाजन यांची ओळख झाली. भाजपचे संकटमोचक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी टाकली गेली. ती त्यांनी यशस्वी पार पाडली. खडसेंचे प्रस्थ पक्षात कमी झाले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचा राजकीय युद्ध सुरु झाले. दोघांमधील आरोप प्रत्यारोप राज्यभरात गाजत राहिले. अजूनही ते थांबलेले नाहीत.

खडसेंची खेळी, गिरीश महाजनांसमोर आव्हान

जामनेर मतदारसंघात गिरीश महाजन यांनी आपला पाय मजबूत करण्यासाठी विरोधक संपवण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी काही महिन्यांपूर्वी त्यांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस नेते संजय गरूड यांना भाजपत आणले. त्यामुळे महाजन यांचा एकतर्फी विजय होईल, असे वाटत होते. परंतु एकनाथ खडसे आणि शरद पवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर कुरघोडी केली. त्यामुळे जामनेर मतदार संघात गिरीश महाजन यांच्यासमोर 2024 च्या निवडणुकीत अनेक संकटे आहेत. एकनाथ खडसे हे गिरीश महाजन यांचा पराभव करण्यासाठी जंग जंग पछाडणार आहेत. त्याची सुरुवात त्यांनी केली आहे. मागील महिन्यात त्यांनी भाजप नेते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मराठा समाजातील मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणारे दिलीप खोडपे यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात आणले. आता ते महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. त्याबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले होते, ‘गेल्या सहा-सात टर्मपासून आपल्या विरोधात अनेक जण लढा देऊन थकले आहे. आता कोणालाही येऊ द्या. गंमत बघा. घोडा-मैदान समोर आहे. निवडणूक संपल्यावर माझ्याशी बोला.’

यामुळेही खडसेंची नाराजी

गिरीश महाजन यांनी 2019 च्या निवडणुकीत मुक्ताईनगर मतदार संघातून एकनाथ खडसे यांना भाजपचे तिकीट मिळू दिले नव्हते. त्यांच्या ऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे – खेवलकर यांना तिकीट देण्यात आले. परंतु त्यांचा पराभव पक्षातील काही लोकांनीच केल्याचा आरोप एकनाथ खडसे करत आहेत. त्यामुळे आता गिरीश महाजन विरोधात जामनेरमध्ये एकनाथ खडसे आघाडी उघडणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांचेही महाजन यांना आव्हान

गिरीश महाजन यांचा पराभव करण्यासाठी एकनाथ खडसे उघडपणे समोर येणार आहे. त्याचवेळी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सुद्धा गिरीश महाजन यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मनोज जरांगे पाटील गिरीश महाजन यांच्यावर नाराज आहेत. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु असताना ते सोडण्यासाठी सरकारकडून गिरीश महाजन यांना पाठवण्यात आले होते. मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले, परंतु त्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाही, असा आरोप मनोज जरांगे यांचा आहे. यामुळे जामनेरमध्ये सभा घेऊन त्यांनी गिरीश महाजन यांना आव्हान दिले होते. मनोज जरांगे म्हणाले होते, ‘तुम्हाला तीन-चार वेळा मंत्रीपद काय मिळालं तर तुम्ही उड्या मारायला लागले आहेत. तुमच्या डोक्यात मंत्रीपदाची हवा घुसली आहे. पण तुमच्या एक लक्षात नाही. जामनेर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 36 हजार कुणबी मराठ्यांचे मतदान आहे’.

असा होता 2019 मधील निकाल

उमेदवार पक्ष मते
गिरीश दत्तात्रय महाजन भाजप ११४७१४
संजय भास्करराव गरुड राष्ट्रवादी काँग्रेस ७९७००
भीमराव नामदेव चव्हाण वंचित आघाडी ६४७१
विजय जगन तन्वर राष्ट्रीय जनक्रांती पार्टी २१७८
नोटा २१०५
शक्तीवर्धन शांताराम सुरवाडे बसपा ६७३
गजानन रामकृष्ण माळी अपक्ष ६५९
पवन पांडुरंग बंडे अपक्ष ५१४
वसंत रामू इंगळे अपक्ष ३७२

मागील पंचवर्षिक म्हणजे 2019 च्या निवडणुकीत भाजपचे गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेचे संजय गरुड (आता संजय गरुड भाजपमध्ये) यांच्यात मुख्य लढत झाली होती. संजय गरुड हे मराठा चेहरा होते. त्या निवडणुकीत गिरीश महाजन यांना 1 लाख 14 हजार 714 मते मिळाली होती. तर संजय गरुड यांना 79 हजार 700 एवढी मते पडली होती. 35 हजार 14 मतांनी गिरीश महाजन विजयी झाले होते. एकूण मतदानापैकी 54.95 टक्के मते गिरीश महाजन यांना मिळाली होती. गिरीश महाजन यांचे मताधिक्य वाढले होते. परंतु आता संजय गरुड भाजपमध्ये आहे. भाजपचे दिलीप खोडपे राष्ट्रवादीत आहे. ते मराठा आहेत. त्यांना मनोज जरांगे यांची साथ मिळणार आहे. ग्रामीण भागावर दिलीप खोडपे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांना तगडे आव्हान ते देणार आहेत. दुसरीकडे गिरीश महाजन समाजापेक्षा केलेल्या कामावर भर देणार आहेत. विकासाची कामे मतदार संघात झालीच आहे. परंतु मतदार संघातील कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्याच्या समस्येबाबत गिरीश महाजन धावून गेले आहे. त्यासाठी त्यांची खास टीम नेहमी कार्यरत राहिली आहे. जळगावपासून मुंबईपर्यंत रुग्णांना त्यांनी मदत केली आहे. त्यामुळे तो फायदा गिरीश महाजन यांना मिळणार आहे. परंतु प्रत्यक्षात चित्र काय असणार आहे? हे 23 नोव्हेंबर रोजीच समजणार आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.