जरांगे यांना खुलं आव्हान आहे की त्यांनी निवडणूक लढवावी – प्रविण दरेकर

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली असली तरी अंतिम निर्णय ते २० ऑक्टोबर रोजी घेणार आहे. त्यावरुन प्रविण दरेकर यांनी जरांगे यांना खुलं आव्हान दिले आहे.

जरांगे यांना खुलं आव्हान आहे की त्यांनी निवडणूक लढवावी - प्रविण दरेकर
Follow us
| Updated on: Oct 17, 2024 | 7:53 PM

मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सतत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचे आहे पण देवेंद्र फडणवीस त्यांना रोखत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला होता. त्यावर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी उत्तर दिले आहे, ते म्हणाले की, जरांगे पाटील हे कुणाचा एन्काऊंटर करतायेत. भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी महाविकास आघाडीचे एन्काऊंटर करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आमचं जरांगे यांना खुला आव्हान आहे की त्यांनी निवडणूक लढवावी. सुपारी घेतल्यासारखा बोलू नये. जरांगे केवळ फडणवीस यांच्यात द्वेषातून कुणाची तरी सुपारी घेतल्यासारखं वारंवार बोलत आहेत. लोकांच्याही आता ते लक्षात आलंय.

‘सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नही हो सकता. अगदी तसेच देवेंद्र फडणवीस हे जरांगेमुळे परेशान होऊ शकतात पण ते पराजित नक्कीच होणार नाहीत. उलट विजयी होतील आणि मोठ्या फरकाने विजयी होतील हा आमचा विश्वास आहे.

श्याम मानव यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून लाडक्या बहिणी बद्दलचे विधान केले आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. लाडकी बहीण योजना ही सुपरहिट ठरली आहे आणि महायुती मोठ्या फरकाने विजयाकडे घोडदौड करतेय असेच मी म्हणेन.

पाच आमदारांच्या बद्दल नेमकी कुठून माहिती आली हे मलाही माहित नाही. कारण मी केंद्रीय संसदीय समितीच्या बैठकीत होतो. असा कुठलाही प्रस्ताव पास झाला नाहीये. कुणाचे टिकीट कापले जाणार नाहीये. त्या केवळ पेरलेल्या बातम्या आहेत.

मला एवढेच सांगायचे की महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचे बरेच चेहरे आहेत आणि प्रत्येकाला आता डोहाळे लागलेले आहेत. यातूनच अनिल परब, उद्धव ठाकरे यांच्या बद्दल मुख्यमंत्रीपद मिळेल असं विधान करतात, त्यातूनच मग जयंत पाटलांनी ही डोहाळे लागले आहेत. अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.