सातारा: मागच्या निवडणुकीत आपला पाटण इथे पराभव झाला. पराभव मोठ्या मोठ्या व्यक्तींच्याही वाट्याला आहे. इंदिरा गांधींचाही (indira gandhi) पराभव झाला होता. मात्र मला इथल्या लोकांचे कौतुक करावेसे वाटते. कार्यकर्त्यांनी इथे पक्ष जिवंत ठेवला आहे. नाराजी असताना लोकांनी पक्षाची साथ सोडली नाही. ही आपल्या पक्षाची जमेची बाजू आहे. ही ताकद एकसंघ करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी बुथ कमिट्यांचे संघटन करा. आपली ताकद प्रचंड आहे, आपण भिडलो तर विरोधकांचा टिकाव लागणार नाही, असं सांगत राष्ट्रवादीचे (ncp) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास भरला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा आज साताऱ्यातील शेवटचा दिवस असून संपूर्ण राज्य फिरून आल्यानंतर ही यात्रा साताऱ्यात पोहोचली होती. कार्यकर्त्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या या अडचणींची गांभीर्याने नोंद घेणार असल्याचे जयंत पाटील (jayant patil) यांनी आश्वासन दिले. यावेळी पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.
आज महागाई, बेरोजगारी, आरोग्ययंत्रणा या मूळ विषयावर कोण काही बोलत नाही. मात्र ईडी, आयटी, सीबीआय, भोंगा यावर चर्चा सुरू आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पवित्र गंगेतून मृतदेह वाहताना आपण सर्वांनी पाहिले मात्र महाराष्ट्रात आपण कोरोना काळात एक चांगली कामगिरी केली हेही जयंत पाटील यांनी आवर्जून नमूद केले. आपण चांगल्या कामाच्या जोरावर मतं मागू. सर्व आधुनिक व्यवस्था आत्मसात करू आणि एक चांगले यश संपादित करू, असे प्रतिपादन जयंत पाटील यांनी यावेळी केले.
सगळ्या स्थानिक संस्थांमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुमत आहे. आता पक्ष वाढवायचा आहे, याची जबाबदारी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. पक्षाची नव्याने बांधणी करू, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तोंडावर आहेत. आमचे सैन्य तयार आहे, असे सत्यजित पाटणकर यांनी सांगितले.
रामालाही वनवास भोगावा लागला होता, तशी आजची परिस्थिती आहे. नव्याने आपण उभे राहूया. मी वडिलधारी आहे, तुम्हाला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. पक्ष आपल्या पाठिशी खंबीर आहे. संघटना मजबूत करा असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, सत्यजित पाटणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, आयटी सेलचे प्रमुख सारंग पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, संकल्प डोळस, महिला सरचिटणीस संगीता साळुंखे, तालुकाध्यक्ष राजाभाऊ शेलार, तालुका महिला अध्यक्षा स्नेहलताई जाधव, युवती अध्यक्षा रोहिणी पाटील आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात आज प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil यांनी सातारा जिल्ह्यातील जावळी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली.
हा मतदारसंघ कोणाच्याही दावणीला बांधण्याची गरज नाही. हा आपला पक्ष आहे आणि आपल्या पक्षाची ताकद किती आहे हे दाखवून द्या. pic.twitter.com/Knb1wBBdoL
— NCP (@NCPspeaks) April 17, 2022
संबंधित बातम्या:
Raj Thackeray : भोंग्यांच्या मुद्द्यांवरुन राज ठाकरेंना धमकी? केंद्र सरकार सुरक्षा पुरवण्याची शक्यता