वो दौर कुछ और था, ये दौर कुछ और है; पक्ष सोडून गेलेल्यांवर जयंत पाटलांचं भाष्य

पक्षाचे बूथ संघटन अधिक मजबूत करा... जोमाने कामाला लागा... राष्ट्रवादी परिवाराचा विस्तार करा... पवारसाहेबांच्या विचारांचा प्रसार करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज केलं. (jayant patil addressing party workers in rashtrawadi parivar samvad yatra at nagpur)

वो दौर कुछ और था, ये दौर कुछ और है; पक्ष सोडून गेलेल्यांवर जयंत पाटलांचं भाष्य
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 6:32 PM

नागपूर: अनेकजण पक्ष सोडून गेले. मात्र या गोष्टी मागे टाका. ‘वो दौर कुछ और था, ये दौर कुछ और है’ असं सांगत पक्षाचे बूथ संघटन अधिक मजबूत करा… जोमाने कामाला लागा… राष्ट्रवादी परिवाराचा विस्तार करा… पवारसाहेबांच्या विचारांचा प्रसार करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज केलं. (jayant patil addressing party workers in rashtrawadi parivar samvad yatra at nagpur)

राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. आज ही यात्रा नागपुरात पोहोचली. यावेळी जयंत पाटील यांनी नागपूर शहर आणि ग्रामीणचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. नेत्यांची खरी ताकद हे कार्यकर्ते असतात. आपल्या नेत्याच्या मागे कार्यकर्ते नेहमीच उभे राहतात. आज सभागृहात मोठी गर्दी होती, अनिलबाबूंचे कार्यकर्ते त्यांच्या मागे सक्षम उभे राहतात हे पाहून समाधान झाले, अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कौतुक केले.

विरोधकांचा पोटशूळ उठतोय

आगामी काळात नागपूर शहरात निवडणुका होणार आहेत. मागे पक्षाला पराभव पत्कारावा लागला याची आठवण करून देतानाच पक्ष वाढवण्यासाठी कामाला लागा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. नागपूरमध्ये राष्ट्रवादीचे संघटन अत्यंत मजबूत आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण चांगले कामेही करत आहोत. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठतोय. त्यामुळे विरोधकांकडे दुर्लक्ष करून आपले काम करा, असं आवाहन अनिल देशमुख यांनी केलं.

यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, माजी आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार दिनानाथ पडोळे, शहराध्यक्ष अनिल अहिरकर, नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, अल्पसंख्याक सेलचे कार्याध्यक्ष जावेद हबीब, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. (jayant patil addressing party workers in rashtrawadi parivar samvad yatra at nagpur)

संबंधित बातम्या:

Budget 2021: बजेट देशासाठी हवं, निवडणुकांसाठी नको; मुख्यमंत्र्यांचा टोला

अर्थसंकल्पानं देशातील जनतेला मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं; अजित पवारांची जहरी टीका

Budget 2021: निवडणुका असलेल्या राज्यांना जास्त गिफ्ट; महाराष्ट्रासाठी काय?; आदित्य ठाकरेंचा सवाल

(jayant patil addressing party workers in rashtrawadi parivar samvad yatra at nagpur)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.