आमचाच पक्ष मोठा म्हटलं तर अडचणी येतील; जयंत पाटलांचा काँग्रेसला टोला
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेनिमित्त जयंत पाटील हे विदर्भाच्या दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. (jayant patil on alliance in nagpur corporation with congress)
नागपूर: नागपूर महापालिकेत सत्ता बदल होऊ शकतो. जिल्हापरिषदेत आपण पाहिलंच आहे. सर्वजण एकत्र लढले तर नक्कीच बदल होऊ शकतो. पण कुणी जर आमचाच पक्ष मोठा असा आग्रह धरला तर अडचणी येऊ शकतात, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसला लगावला. (jayant patil on alliance in nagpur corporation with congress)
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेनिमित्त जयंत पाटील हे विदर्भाच्या दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. नागपूरमध्ये आले असता पालिका निडवणुकीतील आघाडीवरून त्यांना विचारलं असता त्यांनी काँग्रेसला टोले लगावले. आघाडीच्या माध्यमातूनच पालिकेची निवडणूक लढवली जावी अशी आमची मागणी आहे. महाविकास आघाडीतील मित्रांशी बोलून त्याबाबत निर्णय घेतला जाईल. पण आमचाच पक्ष मोठा असं म्हटलं तर अडचणी येऊ शकतात, असा टोला पाटील यांनी काँग्रेसला लगावला. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत आघाडी करुन लढायचे की स्वबळावर लढायचे याचा निर्णय स्थानिक पातळीवरील नेत्यांना विश्वासात घेऊन घेतला जाईल. यावेळी सर्व पक्षांनी एकत्रित ताकद लावली तर नागपूर जिल्हा परिषदेप्रमाणे नागपूर महानगरपालिकेत देखील परिवर्तन होऊ शकतं, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
केंद्राने नंतरच घोषणा कराव्या
यावेळी पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकारने अलिकडे केलेल्या घोषणा फलद्रूप झालेल्या नाहीत. घोषणा केल्या पण त्याचे पैसेच पोहोचले नाहीत. केंद्र सरकारने राज्य सरकारचे जीएसटीचे 27 हजार कोटी रुपये द्यावेत. नंतरच नव्या घोषणा कराव्यात. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा करू नयेत, असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला.
महाराष्ट्राच्या गरजांकडे दुर्लक्ष
केंद्र सरकारने काल सादर केलेल्या अर्थसंकल्पावरही त्यांनी टीका केली. केंद्राच्या बजेटमध्ये चार राज्यांना निधी देण्यात आला. मात्र, महाराष्ट्राला काहीच दिले नाही. आता मेट्रोला निधी दिल्याचे सांगितले जात आहे. त्यात नवीन काहीच नाही. महाराष्ट्राच्या ज्या गरजा आहेत, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असंही ते म्हणाले. (jayant patil on alliance in nagpur corporation with congress)
ती घटना घडायला नको होती
यवतमाळ येथे पोलिओ लसीकरणादरम्यान लहान बालकांना सॅनिटायझर पाजण्यात आले होते. या घटनेवरही पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या घटनेचा तपशील लवकरच येणार आहे. पण अशा प्रकारची घटना घडायलाच नको होती. त्यासाठी ज्या त्रुटी राहिल्या त्याबाबत शासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. (jayant patil on alliance in nagpur corporation with congress)
LIVE | महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/AgV2vfPde0
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 2, 2021
संबंधित बातम्या:
सगळ्यांनाच राज ठाकरे होता येत नाही; मनसेच्या आऊटगोईंगवर बाळा नांदगावकरांची सूचक प्रतिक्रिया
या देशात लोकशाही जिवंत आहे का?; शिवसेनेचा संताप; शेतकरी आंदोलकांशी चर्चा
अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करा अन्यथा…., पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना 15 दिवसांचं अल्टिमेटम
(jayant patil on alliance in nagpur corporation with congress)