घोडेबाजार करता येत नसल्याचं भाजपला दुःख होतंय, असं जयंत पाटील का म्हणाले?

विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक हात वर करुन मतमोजणी करुन होणार आहे. हे दुःख भाजपला वाटत असेल, असा टोला जयंत पाटलांनी लगावला आहे.

घोडेबाजार करता येत नसल्याचं भाजपला दुःख होतंय, असं जयंत पाटील का म्हणाले?
जयंत पाटील
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 8:59 PM

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election) हात वर करून मतमोजणी करुन होणार असल्याने कदाचित भाजपला (Bjp) यात घोडेबाजार करता येणार नाही, हे त्यांना दुःख वाटत असेल असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांशी बोलताना लगावला आहे. राज्यसभेने ज्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे, त्याच तंतोतंत पद्धतीने आम्ही विधानसभेत निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक हात वर करुन मतमोजणी करुन होणार आहे. हे दुःख भाजपला वाटत असेल. म्हणून लोकशाही, पारदर्शक व महाराष्ट्रातील जनतेच्यादृष्टीने अतिशय चांगला निर्णय विधानसभेतल्या नियमात बदल करुन महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

राज्यपालांकडे धाव घेणे दुर्दैवी

याविरोधात भाजपचे लोक राज्यपालांकडे धाव घेत आहेत हे दुर्दैवी आहे. इथून पुढे अध्यक्षपदाची निवडणूक हात वर करुन उमेदवाराला पाठिंबा देत होणार आहे. पुढील काळासाठी देखील हीच पद्धत कायम राहील, याचे भाजपला दुःख वाटण्याचे कारण काय? अशी विचारणाही जयंत पाटील यांनी केली आहे. गेल्या अधिवेशनावेळी विधानसभा अध्यक्ष निवडीवरून जोरादार राडा झाल्याचे पहायाला मिळाले. नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार हे स्पष्ट झाल्यानंतर नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपद सोडले होते. त्यानंतर हे पद रिक्त आहे. महाविकास आघाडीतील कोण अध्यक्ष होणार हे ठरत नसल्यामुळे हे पद रिक्त होते. विधानसभा अध्यक्ष कोण होणार हे जरी अजून स्पष्ट नसले, तरी त्यावरून बराच वाद झाला आहे.

भाजपने विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त मतदान पद्धतीने घ्यावी अशी मागणी केली होती, मात्र महाविकास आघाडी सरकार अध्यक्ष निवडीची निवडणूक ही हात वर करून मतदान घेऊन करण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून आले. विधानसभा अध्यक्ष निवडीची तारीखही गेल्या अधिवेशनात ठरवली होती, मात्र राज्यपाल यांच्या पत्रानंतर अध्यक्ष निवडीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. याचवेळी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात लेटवॉरही झाल्याचे दिसून आले. राज्यपालांच्या खरमरीत पत्रानंतर घटनात्मक पेच नको म्हणून निवडणूक पुढे ढकलत असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. आता येत्या अधिवेशनात अध्यक्षांची निवड होणार आहे, अशी माहिती महाविकास आघाडीतील नेत्यांकडून देण्यात आली आहे.

रोड शो, रॅलीवरील बंदी वाढवली! पण तरिही दिलासादायक कोणता निर्णय निवडणूक आयोगानं घेतलाय?

पुन्हा “मोदी”वरून खडाखडी, हायकमांडने झापल्यानंतर नानांनी तयार केला कथित मोदी :- खासदार सुनील मेंढे

Goa Assembly Election 2022 : गोव्यात काँग्रेस उमेदवारांनी घेतली शपथ, भाजपचं टेन्शन वाढलं

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.