अजित पवार गटाची मोठी खेळी, जयंत पाटील यांना होमपिचवर झटका बसणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट जयंत पाटील यांना त्यांच्या सांगली मतदारसंघात मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. कारण जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले नगरसेवक अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अजित पवार गटाची मोठी खेळी, जयंत पाटील यांना होमपिचवर झटका बसणार?
Follow us
| Updated on: Jan 30, 2024 | 3:08 PM

शंकर देवकुळे, Tv9 मराठी, सांगली | 30 जानेवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले काही नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे याआधी अजित पवार गटाने माजी नगरसेवक पद्माकर जगदाळे, तसेच माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विटाचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचा पक्षप्रवेश करुन शरद पवार गटाला झटका दिला होता. त्यानंतर आता पुन्हा जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक नगरसेवक अजित पवार गटात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांनी सोमवारी कोल्हापुरात सांगलीतील माजी महापौर आणि नगरसेवकांनी भेट घेतली. यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी महापौर सुरेश पाटील, माजी नगरसेवक हणमंत पवार, विष्णु माने, गजानन मगदुम यांचा समावेश आहे. त्यांच्यासमवेत अजित पवार गटाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे तसेच माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी उपस्थित होते. या नेत्यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने जयंत पाटील यांना अजित पवार गट दुसरा जोरदार धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अजित पवार यांच्या 5 फेब्रुवारीच्या सांगली जिल्ह्यातील दौऱ्यात जयंत पाटील यांचे अनेक कट्टर समर्थक अजित पवार यांच्या गटात जाहीर प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता असल्याची चर्चा जिल्ह्यात जोरदार सुरू झाली आहे

अजित पवार यांच्या पक्षप्रवेशावेळी जयंत पाटील यांना धक्का बसणार?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी कोल्हापुरात भेट घेतली. मात्र ही भेट राजकीय नसल्याचे सर्वांनी सांगत सांगलीत राज्यस्तरीय खोखो स्पर्धेसाठी निमंत्रण देण्यासाठी आणि विकास कामासाठी भेटल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीमध्ये अजितदादांच्या 5 फेब्रुवारीच्या सांगली दौऱ्यात अनेकांचा प्रवेश होण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे.

महापालिका क्षेत्रात जयंत पाटील यांच्या गटाची मोठी पडझड गेल्या काही दिवसांत झाल्याने या भेटीकडे राजकीय अर्थाने पाहिले जात आहे. कोल्हापूर येथे सोमवारी उपुख्यमंत्री अजित पवार आले असताना सांगलीतील माजी महापौर आणि नगरसेवकांनी भेट घेतली. यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी महापौर सुरेश पाटील, माजी नगरसेवक हणमंत पवार, विष्णु माने, गजानन मगदुम यांनी भेट घेतली. त्यांच्यासमवेत अजित पवार गटाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे तसेच माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी उपस्थित होते.

या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून 5 फेब्रुवारीच्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आणि वेळ घेण्यासाठी आणि विकास कामांसाठी आम्ही अजितदादांची भेट घेतल्याचं काहींनी स्पष्ट केलं. खो-खो स्पर्धसाठी निमंत्रण हे जरी निमित्त असले तरी सोमवारच्या भेटीतील मंडळी अजित पवारांच्या सांगली दौऱ्यात त्यांच्या गटात प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा मात्र सांगलीत जोर धरत आहे.

अजित पवार यांच्या सांगली दौऱ्याच्या वेळी जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या माजी नगरसेवकांचा मोठा गट हा बिनशर्त राष्ट्रवादी अजित पवार गटात दाखल होईल, अशी सूत्रांची माहिती आहे. याआधी पद्माकर जगदाळे तसेच माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विटाचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील आदींनी प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अजितदादा पवार गट दुसरा धक्का देण्याच्या तयारीच्या हालचालींना आता सांगली जिल्ह्यात वेग आल्याची चर्चा जोरदारपणे सुरू आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.