BREAKING : नागपूर अधिवेशनापर्यंत जयंत पाटील यांचं निलंबन
हिवाळी अधिवेशनातून आज जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं आहे. निलंबनाचा ठराव मांडत जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं.
Jayant Patil Suspension : राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील ( Jayant Patil ) यांचं निलंबन करण्यात आलं आहे. नागपूर अधिवेशनापर्यंत ( Maharashtra Winter Session 2022 ) जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलंय. अध्यक्षांबाबत अपशब्द वापरल्याने जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
जयंत पाटील यांच्या निलंबनाचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला. विरोधापक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी देखील या प्रकारावर दिलगिरी व्यक्त केली.
जयंत पाटील यांच्या निलंबना विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत. पुणे महापालिकेच्या गेटवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्यामुळे जयंत पाटील आक्रमक झाले होते. पण यावेळी बोलत असताना त्यांनी विधानसभा अध्यक्षांना असंसदीय शब्द वापरला. त्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला आणि जयंत पाटलांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. यानंतर जयंत पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यांचं निलंबन झालं.
निलंबनाची कारवाई केल्यानंतर जयंत पाटील यांनी सभागृहाचा त्याग केला. यानंतर विरोधकांकडून देखील दिलगिरी व्यक्त करत सभात्याग करण्यात आला.