ज्यांची नजर वाकडी त्यांना सगळंच वाकडं दिसतं; जितेंद्र आव्हाडांची टीका

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहांवर टीका केली आहे. (jitendra awhad criticized amit shah over mahavikas aghadi)

ज्यांची नजर वाकडी त्यांना सगळंच  वाकडं दिसतं; जितेंद्र आव्हाडांची टीका
जितेंद्र आव्हाड
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 3:57 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहांवर टीका केली आहे. ज्यांची नजर वाकडी त्यांना सगळंच वाकडं दिसतं. आम्हाला तीन चाकी सरकार म्हणाले, म्हणू द्या. तीन चाकी तर हेलिकॉप्टरही असतं, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी शहा यांना लगावला आहे. (jitendra awhad criticized amit shah over mahavikas aghadi)

‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांनी हा टोला लगावला. अमित शहा यांनी दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात येऊन ठाकरे सरकारला तीन चाकी सरकारची उपमा दिली होती. तोच धागा पकडून आव्हाड यांनी शहांवर टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यावरून यूटर्न घेतला नसल्याचं सांगितलं. पवारांनी यूटर्न घेतला हा अनुमान कसा काढता? त्यांनी काय नाव घेतलं. भाजपचे काही खासदारही कायद्याला विरोध करत आहेत, असं सांगतानाच अद्याप कुणीही यूटर्न घेतलेला नाही, असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकरी आंदोलन हाताळण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच स्वत:ला वाचवण्यासाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

इतिहासाची पुनरावृत्ती घडेल

केंद्राच्या कायद्याला लोक काळा कायदा म्हणत आहेत. मला इतिहास आठवतोय. 1908मध्ये रोलेट अॅक्ट नावाचा कायदा आला होता. लॉर्ड चेम्सफर्डने हा कायदा आणला होता. त्याला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. जालियनवाला बाग येथे त्या कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. जनरल डायरने गोळीबार केला. आंदोलन चिघळलं. इंग्रजांना कायदा मागे घ्यावाल लागला. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे, असं आव्हाड म्हणाले. हा देश दांडुक्यांना, लाठ्याकाठ्यांना घाबरत नाही. देशात क्रांती घडेल. तेव्हाच देश शांत बसेल. सरकारने लोकशाहीचं तंत्रं वापरावं, चर्चा करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

बंद खोलीत साक्षीदार का ठेवला नाही?

यावेळी भाजपने शिवसेनेला दिलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या आश्वासानावरही आव्हाड यांनी भाष्य केलं. बंद खोलीचा इतिहास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांनाच माहीत. तिसऱ्या व्यक्तिला त्याची माहिती नाही. त्यामुळे त्यावर बोलता येणार नाही. तुम्ही बंद खोलीत काय केलं आम्हाला काय माहीत? तुम्ही एखादा साक्षीदार ठेवायला हवा होता ना?, असं सांगतानाच बदनामीने काहीही फरक पडत नाही. कोण खरं बोलत आहे आणि कोण खोटं बोलत आहे हे जनतेला चांगलं माहीत आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

एकाच आशयाचं ट्विट कसं?

सेलिब्रिटीजनी केलेल्या ट्विटवरही त्यांनी भाष्य केलं. सेलिब्रिटींना शिकवून पाठवलेलं आहे. त्यांनी एकाच आशयचां ट्विट केलं आहे. त्यामुळे जे सत्य आहे ते समोर येणारच, असंही ते म्हणाले. (jitendra awhad criticized amit shah over mahavikas aghadi)

संबंधित बातम्या:

लता मंगशेकर, सचिन तेंडुलकर, सायनाच्या ट्विटची चौकशी होणार; देशमुखांकडून सेलिब्रिटी ट्विटच्या चौकशीचे आदेश

देवेंद्र फडणवीस म्हणाले, फासा आम्हीच पलटणार, आता रोहित पवारांचं उत्तर

मुंबई विद्यापीठाचं काम ‘IIFCL’लाच देण्याचा आग्रह का? राज्यपालांच्या प्रस्तावावर युवासेनेचा सवाल

(jitendra awhad criticized amit shah over mahavikas aghadi)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.