बाबाला अद्दल घडवा, कालीचरण बाबाविरोधात जितेंद्र आव्हाडांची पोलिसात तक्रार

छत्तीसगडमधील धर्मसंसदेत कालीचरण बाबानं महात्मा गांधींबाबत संतापजनक वक्तव्य करून नवा वाद निर्माण केलाय. महात्मा गांधींबाबत अपशब्दांचा वापर करतानाच कालीचरणनं नथुराम गोडसेंना नमन केलंय. त्यावरून जितेंद्र आव्हाड संतप्त झाले आहेत.

बाबाला अद्दल घडवा, कालीचरण बाबाविरोधात जितेंद्र आव्हाडांची पोलिसात तक्रार
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 6:03 PM

ठाणे : छत्तीसगडमधील धर्मसंसदेत कालीचरण बाबानं महात्मा गांधींबाबत संतापजनक वक्तव्य करून नवा वाद निर्माण केलाय. महात्मा गांधींबाबत अपशब्दांचा वापर करतानाच कालीचरणनं नथुराम गोडसेंना नमन केलंय. त्यावरून जितेंद्र आव्हाड संतप्त झाले आहेत. बाबाविरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात असतानाच कालीचरण बाबानं आणखी एक व्हिडीओ शेअर करत फासावर द्या मात्र माफी मागणार नाही असं म्हणत वादाला आणखी फोडणी दिली. कालीचरण बाबाच्या संतापजनक वक्तव्याचे पडसाद राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही उमटेल. मविआ नेत्यांनी कालीचरण बाबावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावरून मंत्री जितेंद्र आव्हाडही पोलिसात गेले आहेत.

जितेंद्र आव्हाडांची पोलिसात तक्रार

कालीचरण बाबाच्या संतापजनक विधानावरून काँग्रेस आक्रमक झाली असतानाच राष्ट्रवादी नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नौपाडा पोलिसात या बाबाविरोधात तक्रार दाखल केली आहे. फॅसिजनविरुद्ध मैदानात उतरूनच लढावे लागेल. गोडसेच्या पाठीराख्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार अद्दल घडवावी लागेल. मी स्वतः दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक न ठेवता कालीचरण बाबा विरुद्ध नौपाडा पोलीस स्टेशन ठाणे येथे गुन्हा नोंदवायला चाललो आहे. ही विचारांची लढाई आहे. असे ट्विटही मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. ही टीका करून कालिचरण याने सबंध देशवासियांचा अवमान केला आहे. त्याबद्दल जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धडक दिली. तसेच कालिचरण बाबाविरोधात फिर्याद दाखल केली.

कालीचरण बाबाच्या विधाननंतर काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

कालीचरण बाबाच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. कालीचरण विरोधात अकोल्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलंय. तर महाराष्ट्रात आघाडीचं सरकार असताना कालीचरणला तुम्ही का अटक करत नाही, असा सवाल करत भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी मविआ सरकारवरच निशाणा साधलाय. कालीचरण बाबाचा हा काही पहिलाच वाद नाही. याआधी कोरोनावरून संतापजनक वक्तव्य करत कालीचरणनं आरोग्य यंत्रणा, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा अपमान केला होता आणि आता गांधींबाबत हे वादग्रस्त विधान केलंय. त्यामुळे आता पोलीस प्रशासन या बाबावर काय कारवाई करतंय? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....