Jitendra Awhad: तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा दिसतोय ते आरशात पाहा; जितेंद्र आव्हाडांचं खोचक उत्तर

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांचा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे, असी खोचक टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आव्हाडांवर केली होती. त्याच्यावर आव्हाड यांनी पलटवार केला आहे. माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे अशी टीका करत त्यांनी नक्कल केली.

Jitendra Awhad: तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा दिसतोय ते आरशात पाहा; जितेंद्र आव्हाडांचं खोचक उत्तर
तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा दिसतोय ते आरशात पाहा; जितेंद्र आव्हाडांचं खोचक उत्तर Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 3:16 PM

ठाणे: जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांचा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे, असी खोचक टीका मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी आव्हाडांवर केली होती. त्याच्यावर आव्हाड यांनी पलटवार केला आहे. माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे अशी टीका करत त्यांनी नक्कल केली. एक तर स्टँडअप कॉमेडियनच्या जागा खाली आहेत. त्या त्यांनी घ्याव्यात. माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे, होय आहे. मला त्याचा अभिमान आहे. मस्ती करणाऱ्यांना तो बरोबर फणा काढून दाखवतो. पण तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे, अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मीडियाशी संवाद साधताना हा पलटवार केला आहे. यावेळी आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरेही दिली आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या शरद पवारांवरील आरोपांचाही समाचार घेतला. शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेत नाहीत? असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं. शाहू, फुले. आंबेडकर हे छत्रपती त्यांच्या विचारांचे वारसदार होते. राज ठाकरे यांनी कधी बहुजनांचा इतिहास वाचलाच नाही ना. नेहमी पुरंदरे यांचाच इतिहास वाचत गेले. ज्या पुरंदरेनी जेम्स लेनला माहिती देऊन आमच्या जिजाऊंची बदनामी केली. जेम्स लेनच्या पुस्तकातील पान नंबर 93, पॅरेग्राफ नंबर फोर राज ठाकरेंनी वाचावा, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

भोंगे उतरवण्याचा निर्णय नाही

राज ठाकरेंना अवघ्या चार दिवसात उत्तर सभा का घ्यावी लागली? याचं उत्तर राज ठाकरेंनी द्यायला हवे. मशिदीवरील भोंगे उतरावे असा निर्णय नाही. फक्त आवाज कमी असावा हा नियम आहे. त्याच पालन केल्या जात आहे. काल तुम्ही ठाण्यात आलात त्यावेळी पूर्ण ठाण्यात वाहतुक विस्कळीत होती, असंही ते म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी काल ठाण्यातील उत्तर सभेत जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोचक टीका केली होती. जितेंद्र आव्हाड म्हणतात मुंब्र्यातील मदरश्यात एक वस्तराही सापडणार नाही. सापडणार कसा? ते दाढीच करत नाही, असा टोला राज यांनी लगावला होता. तसेच जितेंद्र आव्हाड यांचा चेहरा फणा काढलेल्या नागासारखा आहे. उद्या म्हणतील डसू शकतो. अरे येच. तुम्हाला गरगर फिरवूनच दाखवतो, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती.

संबंधित बातम्या:

Sharad Pawar On Raj Thackeray : मी अन् अजित पवार वेगळे आहोत वाटतंय का तुम्हाला? राज ठाकरेंच्या गुगलीवर पवार पत्रकारांवरच जेव्हा भडकतात

Sharad Pawar on Raj Thackeray : छत्रपतींचं नाव का घेत नाहीत? राज ठाकरेंच्या सवालाला शरद पवारांचं पुराव्यानिशी उत्तर

Sharad Pawar on INS Vikrant Case : मग ती रक्कम पक्षाकडे का दिली? किरीट सोमय्यांच्या ‘विक्रांत फाइल्स’वर पवारांचा पहिल्यांदाच सवाल

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.