‘मुख्यमंत्र्यांची ताकद काय असते हे अजित पवारांना…’, जितेंद्र आव्हाड यांनी डिवचलं

"माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि अजित पवार यांची तुलना होऊच शकत नाही. त्यांच्या काळामध्ये शरद पवार हे मुख्यमंत्री होते. शरद पवार देशाचे विरोधी पक्षनेते होते. शरद पवार उच्च पदस्त राजकारणी होते. त्यामुळे कोणी पंतप्रधान असो, कुठलाही मंत्री असो ते सगळे शरद पवारांच्या संबंधापोटी बारामती व्यवस्थित लक्ष देते असे", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

'मुख्यमंत्र्यांची ताकद काय असते हे अजित पवारांना...', जितेंद्र आव्हाड यांनी डिवचलं
जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार
Follow us
| Updated on: Sep 08, 2024 | 11:04 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमत्रीपदावरुन डिवचलं आहे. “अजित पवार बारामती लढतलच. लोकांची मानसिकता संभ्रमावस्थेत नेणे ही एक कला आहे आणि त्या कलेचा ते वापर करत आहे. त्यामुळे लोकांची सहानुभूती कशी निर्माण होईल यासाठी सर्व प्रयत्न आहे”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. “माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि अजित पवार यांची तुलना होऊच शकत नाही. त्यांच्या काळामध्ये शरद पवार हे मुख्यमंत्री होते. शरद पवार देशाचे विरोधी पक्षनेते होते. शरद पवार उच्च पदस्त राजकारणी होते. त्यामुळे कोणी पंतप्रधान असो, कुठलाही मंत्री असो ते सगळे शरद पवारांच्या संबंधापोटी बारामती व्यवस्थित लक्ष देते असे. जर त्यांना वाटत असेल की त्यांच्यामुळे बारामती उभी राहिली तर हा त्यांचा गैरसमज आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“शरद पवार मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्यांची ताकद काय असते हे ते मुख्यमंत्री न झाल्यामुळे अजून त्यांना कदाचित कळली नसेल”, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. “आम्ही एकनाथ शिंदे यांचा अनुभव घेत आहोत आणि तेही घेत आहेत. अर्थमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करावे लागते. वडीलधाऱ्या माणसाचे अपमान करणे, पाडून बोलले, वडीलधाऱ्या माणसाची मृत्यूची इच्छा व्यक्त करणे हे लोकांना आवडत नाही. पटत नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

‘अजित पवार काम करत नाहीत का?’

“अजित पवार काम करत नाहीत का? काम करतात. मात्र काकांना बाहेर काढावं हे म्हणणं लोकांना आवडत नाही. सर्व बारामतीला माहिती आहे की बॉस कोण आहे. कामाशिवाय देखील आपलं नातं असतं. कुठलीही विधानसभा ही भवितव्याची निवडणूक असते. महाराष्ट्राला भवितव्य कोण देणार हे सर्वांना माहिती आहे. त्यांची पकड जेवढी मोठी असते, मतदारसंघात तेवढेच ते मोठे नेते असतात”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“जो पक्ष अक्षरशः हिसकावून घेतला, तुम्ही राजकीय करामती केल्या, एवढा प्रामाणिकपणे तुम्हाला पश्चाताप होत असेल तर पत्रकारांना जाऊन सांगा हा पक्ष आणि निशाणी मी चोरून आणला आहे. मी माझी निशाणी आणि पक्ष म्हणून वेगळा लढतो असे सांगा”, असं जितेंद्र आव्हाड अजित पवारांना उद्देशून म्हणाले.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.