राणे म्हणाले, ‘घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन’, आव्हाडांकडून व्हिडीओ ट्विट

राजकोट किल्ल्यावर आज मोठा राडा झाला. या राड्यावेळी भाजप खासदार नारायण राणे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन विरोधकांकडून त्यांच्यावर निशाणा साधला जातोय. जितेंद्र आव्हाड यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ ट्विट करत निशाणा साधला आहे.

राणे म्हणाले, 'घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन', आव्हाडांकडून व्हिडीओ ट्विट
आव्हाडांकडून राणेंचा व्हिडीओ ट्विट
Follow us
| Updated on: Aug 28, 2024 | 5:58 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर आज मोठा राडा बघायला मिळाला. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांसह महाविकास आघाडीचे नेते आज राजकोट किल्ल्यावर गेले. राजकोट किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचं अनावरण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. पण त्यानंतर अवघ्या आठ महिन्यात हा 34 फुटांचा भव्य पुतळा कोसळला आहे. त्यामुळे राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी मविआच्या नेत्यांचं शिष्टमंडळ गेलं होतं. पण त्याचवेळी भाजप खासदार नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे हे देखील राजकोट किल्ल्यावर दाखल झाले. यावेळी मोठा राडा झाला.

महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक यावेळी समोरासमोर आले. जवळपास दोन तासांपेक्षा जास्त वेळ राजकोट किल्ल्यावर तणाव होता. यावेळी नारायण राणे यांनी संतापात एक विधान केलं. त्यांच्या त्या वक्तव्यावर विरोधकांकडून निशाणा साधला जातोय. राणेंच्या वक्तव्याचा व्हिडीओ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.

हे सुद्धा वाचा

नारायण राणे नेमकं काय म्हणाले?

“ए, कुणी घोषणाबाजी द्यायची नाही. पोलिसांना जेवढं करायचं ते करा. पण यामुळे आमच्या जिल्ह्यात पोलिसांना असहकार्य असेल, त्यांना येवूदेत, तुम्ही त्यांना आमच्या अंगावर घाला. घरात खेचून एकेकाला रात्रभर मारुन टाकेन. सोडणार नाही”, असं नारायण राणे म्हणाल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन, ही भाषा आहे माजी केंद्रीय मंत्र्यांची! तीही कोणासाठी, तर राजकोट किल्ल्यावर जमलेल्या शिवप्रेमींसाठी! एक तर भ्रष्टाचार करायचा, आणि त्यातून नुकसान झालं, तो उघड झाला की ही गुंडगिरी करायची. भाजपच्या नादाला लागलेल्या या मंत्र्यांनी कोकणासह महाराष्ट्रातील तमाम मराठी लोकांनाही लाज वाटेल असं आज कृत्य केलंय”, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला.

“पक्षाला वाचवायच्या नादात यांची गुंडगिरी एवढी वाढलीये की राज्यातील नेत्यांनाही धमकावण्यापर्यंत यांची मजल गेलीये. बरं आता यांना वाचवायला कायदा आणि सुव्यवस्था डोळे झाकून राहणार यात काही नवल नाही. राज्याचा खेळखंडोबा करून ठेवलाय”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.