कल्याणमधील खडड्यांवरून आव्हाडांचे शिवसेनेवर शरसंधान; आव्हाडांच्या टीकेचं मनसेकडून स्वागत

कल्याणमध्ये प्रचंड प्रमाणावर खडड्यांचं साम्राज्य झालं असून त्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. (jitendra awhad slams shivsena over pothole in kalyan)

कल्याणमधील खडड्यांवरून आव्हाडांचे शिवसेनेवर शरसंधान; आव्हाडांच्या टीकेचं मनसेकडून स्वागत
जितेंद्र आव्हाड
Follow us
| Updated on: Jan 17, 2021 | 5:56 PM

कल्याण: कल्याणमध्ये प्रचंड प्रमाणावर खडड्यांचं साम्राज्य झालं असून त्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या आमदारासमोरच आव्हाड यांनी टीका केली असून मनसेने मात्र क्षणाचा विलंब न करता आव्हाड यांच्या टीकेचं स्वागत केलं आहे. (jitendra awhad slams shivsena over pothole in kalyan)

जितेंद्र आव्हाड एका कार्यक्रमानिमित्त कल्याणमध्ये आले होते. यावेळी त्यांनी ही टीका केली. कल्याणमध्ये रस्त्याची दुर्दशा झाली आहे. तरुणांनी काही तरी बदल केला पाहिजे. चांगले रस्ते दाखवा, अशी स्पर्धा ठेवली पाहिजे, अशा शब्दांत आव्हाड यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला. विशेष म्हणजे केडीएमसीत शिवसेनेची सत्ता असून शिवसेनेच्या आमदारासमोरच आव्हाडांनी हे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाचे मनसे आमदार राजू पाटील यांनी स्वागत केले आहे. ण्यातील एका तरी नेत्याला व्यथा समजली. याचे मी स्वागत करतो. निवडणूका जवळ आल्याने आव्हाड बोलले असतील. मात्र त्यांनी सत्य कथन केले आहे, असा उपहासात्मक टोला पाटील यांनी लगावला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत गेल्या 20 वर्षापासून शिवसेना-भाजपची सत्ता आहे. मधला अडीच वर्षाचा काळ सोडला तर शिवसेना-भाजपची सत्ता होती. राज्यातील युती तुटल्यावर केडीएमसीतही युती तुटली. सत्ता शिवसेनेच्या हाती आली. सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. निवडणूका जवळ आहेत. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी काही दिवसापूर्र्वी घोषणा केली होती की, महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूका लढविल्या जाणार आहे. मात्र आव्हाड यांनी रस्त्याविषयी बोलताना अप्रत्यक्षरित्या शिवसेनेवर टिका केली आहे.

कल्याणमध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्या तर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेसाठी आव्हाड हे कल्याणमध्ये आले होते. शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या समोरच ही टीका केली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत शिवसेना आणि राष्ट्रवादीत धुसफूस सुरू असल्याचं दिसून येत आहे. (jitendra awhad slams shivsena over pothole in kalyan)

संबंधित बातम्या:

आरोग्य विभागात 8 हजार 500 पदांची भरती, आरोग्य मंत्री राजेश टोपेंची घोषणा

खंडणी, ब्लॅकमेलिंग आनि किडनॅप करून भाजप वर आली : अस्लम शेख

वेळ पडल्यास ड्रोन कॅमेरे पुरवायला तयार; तुम्ही कारवाई करा, मी तुमच्या पाठिशी : अनिल देशमुख

(jitendra awhad slams shivsena over pothole in kalyan)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.