जितेंद्र आव्हाड यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होणार? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
जो गुन्हाच केलेला नाही, त्याची शिक्षा का भोगू? वेळ आली तर कायदाही हातात घेणार, असा इशाराच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिलाय
मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी सरकारला इशारा दिलाय. दोन महिन्यांआधी आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. पण आता बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी षडयंत्र सुरु असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. जो गुन्हाच केलेला नाही, त्याची शिक्षा का भोगू? वेळ आली तर कायदाही हातात घेणार, असा इशाराच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिलाय. आव्हाडांच्या एका हातात कुराण तर एका हातात भगवद्गीता आहे. खोट्या विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर बलात्काराच्या गुन्ह्यासाठीही षडयंत्र रचलं जात असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणालेत. जितेंद्र आव्हाडांनी ज्या प्रकरणाचा उल्लेख केलाय ते प्रकरण 2 महिन्यांआधीचं आहे.
ठाण्यातल्या एका उड्डाणपुलाच्या कार्यक्रमावेळी आव्हाडांनी विनयभंग केल्याचा आरोप, भाजपच्या पदाधिकारी रिदा राशीद यांनी केला. त्यानंतर आव्हाडांवर विनयंभगाचा गुन्हा दाखल झाला. त्यावेळी अटकपूर्व जामीनामुळं आव्हाडांची अटक टळली. पण खोट्या गुन्ह्याची जखम कधीही भरणार नाही, असं सांगत आव्हाडांनी हा व्हिड़ीओ शेअर केला.
जितेंद्र आव्हाडांवर बलात्काराचा खोटा गुन्हा नोंदवला तर, राष्ट्रवादीच्या महिला पोलीस स्टेशनला घेराव घालणार, असा इशारा राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाणांनी दिला.
आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊन 2 महिने झालेत. पण आव्हाडांच्या मनातून तो गुन्हा जात नाहीय.
विनयभंग केलाच नाही तरीही खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप आव्हाडांचा आहे. तर आव्हाडांनी अशा प्रतिक्रिया देण्यापेक्षा कोर्टात निर्दोषत्व सिद्ध करावं असं भाजपचे नेते सांगतायत.