Kalicharan Maharaj | कालीचरण महाराज पुणे पोलिसांच्या ताब्यात, दुपारी रायपूरमधून पुण्यात आणलं जाणार

महात्मा गांधी यांच्याविषयी बोलताना अर्वाच्च तसेच शिवराळ भाषा वापरणाऱ्या कालीचरण महाराजला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. कालीचरण महाराजला पुणे पोलिसांनी रायपूरमधून ताब्यात घेतलं असून यापूर्वी त्याच्याविरोधात पुण्याच्या खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Kalicharan Maharaj | कालीचरण महाराज पुणे पोलिसांच्या ताब्यात, दुपारी रायपूरमधून पुण्यात आणलं जाणार
कालीचरण महाराज
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 11:15 AM

पुणे : महात्मा गांधी यांच्याविषयी बोलताना अर्वाच्च तसेच शिवराळ भाषा वापरणाऱ्या कालीचरण महाराजला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. कालीचरण महाराजला पुणे पोलिसांनी रायपूरमधून ताब्यात घेतलं असून यापूर्वी त्याच्याविरोधात पुण्याच्या खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कालीचरण महाराज याला दुपारी पुण्यात आणलं जाणार आहे.

कालीचरण महाराज पुणे पोलिसांच्या ताब्यात 

काही दिवसांपूर्वा कालीचरण महाराजने राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्याविषयी बोलताना अर्वाच्च भाषा वापरली होती. तसेच गांधीजींविषयी बोलताना शिवराळ भाषा वापरत गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेचा उदोउदो केला होता. कालीचरण महाराजाच्या या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याला उत्तराखंड पोलिसांनी अटक केलं होतं. आता उत्तराखंडमधील रायपूर पोलिसांकडून कालीचरण महाराजला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

मिलिंद एकबोटे यांच्यावरही आहे गुन्हा दाखल 

पुणे पोलीस कालीचरण महाराजाला आज दुपारपर्यंत पुण्यात घेऊन येणार आहेत. त्यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे भडकाऊ आणि चितावणीखोर भाषण केल्याप्रकरणात गुन्हा दाखल आहे. कालीचरण महाराजासोबतच समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह इतरांवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. कालीचरण महाराज यांना पुण्यत आणल्यानंतर त्यांची चौकशी केली जाणार आहे.

कालीचरण महाराजने काय वादग्रस्त वक्तव्य केलं ?

कालीचरण महाराजने मोहनदास करमचंद गांधी यांच्याविषयी बोलताना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली होती. त्याचा एक व्हिडीओ समोर आला होता.  याच व्हिडीओत कालीचरण महाराजानं गांधीजींना अपशब्द म्हटल्यानंतर नथूराम गोडसेचे आभार मानलेत. त्याच्या कृतीचं अभिनंदन केलंय. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये धर्मसंसद पार पडली होती. याच धर्मसंसदेत कालीचरण महाराजानं हे तारे तोडले होते.

इतर बातम्या :

Jitendra Awhad|माझ्या घरावर मोर्चा येणार; मंत्री आव्हाडांची ट्वीट करून माहिती, नेमके कशामुळे आंदोलन?

Coronavirus: राज्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, पण निर्बंध कडक करण्याचा विचार; अजित पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाचा निर्णय

Bulli Bai | ट्विटरवर फेक अकाऊंट, बुल्लीबाई अॅप प्रकरणात 18 वर्षाची तरुणी मास्टरमाईंड ? पोलिसांनी बेड्या ठोकल्या

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.