नाशकात मंदिराचा खर्च चालवण्यासाठी भक्तांकडून वसुली, प्रशासन म्हणतं, दर्शन हवं तर 100 रुपये मोजा!
कालिका मंदिर प्रशासनाने येत्या नवरात्रोत्सव काळात 100 रुपये शुल्क आकारून टोकन पद्धतीने दर्शना देण्याचा निर्णय घेतला आहे. काही भाविकांनकडून या शुल्क आकारणीला विरोध होत आहे. मात्र, मंदिर प्रशासन या निर्णयावर ठाम आहे. कोरोनामुळे मंदिर प्रशासनाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे.
नाशिक : कोरोना संकटाच्या काळात राज्यातील मंदिरे बंद होती. त्यामुळे अनेक मंदिराचं उत्पन्न पूर्णपणे ठप्प झालं होतं. आता घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरे आणि सर्व धार्मिक स्थळे सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. अशावेळी काही मंदिर संस्थानांनी आता भाविकांकडून शुल्क आकारुन दर्शनाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नाशिकच्या कालिका मंदिर प्रशासनानंही अशाच प्रकारचा एक निर्णय घेतला आहे. (Devotees will have to pay Rs 100 for darshan at Kalika temple in Nashik)
कालिका मंदिर प्रशासनाने येत्या नवरात्रोत्सव काळात 100 रुपये शुल्क आकारून टोकन पद्धतीने दर्शना देण्याचा निर्णय घेतला आहे. काही भाविकांनकडून या शुल्क आकारणीला विरोध होत आहे. मात्र, मंदिर प्रशासन या निर्णयावर ठाम आहे. कोरोनामुळे मंदिर प्रशासनाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला ही पैसे नाहीत. त्यामुळे भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाने केलं आहे.
घटस्थापनेपासून मंदिरे सुरु होणार
राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळं सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 24 सप्टेंबर रोजी घेतला होता. दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, असं मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले होते.
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी रोज 15 हजार भाविकांनाच प्रवेश
महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी शारदीय नवरात्र उत्सव सूरु होण्यापूर्वी मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानं काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. दिवेगावकर यांनी सुरुवातीला मंदिरात 30 हजार भाविकांना प्रवेश दिला जाईल असे लेखी आदेश काढेल. हे आदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या ग्रुपवर जिल्हाधिकारी यांचा दुसरा आदेश धडकला. त्यात दररोज 15 हजार भाविकांना प्रवेश दिल्याचे आदेश केले. हा आदेशही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भाविकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. मात्र 15 हजार भाविकांच्या प्रवेशाबाबत मंदिर संस्थानच्या नियमावलीची प्रेस नोट जाहीर झाल्याने संभ्रम दूर झाला. नवरात्रोत्सवात तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी रोज लाखो भाविक तुळजापुरात येत असतात. त्यामुळे 15 हजारांची मर्यादा वाढवावी, अशी मागणी स्थानिक, पुजारी आणि भक्तांकडून होत आहे.
इतर बातम्या :
पिंपरी-चिंचवड पुन्हा काबिज करण्यासाठी शरद पवार मैदानात! आता भाजप काय रणनिती आखणार?
फडणवीसांचा पाहणी दौरा आणि पंकजा मुंडे अचानक ‘अनवेल’, राजकीय चर्चेला तोंड फुटलं
Devotees will have to pay Rs 100 for darshan at Kalika temple in Nashik