अवकाळी पावसात होतं नव्हतं सगळं गेलं;कलिंगड, टोमॅटो, कांदा पिकांची लागली वाट…

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आता तरी सरकारने अवकाळी पावसात नुकसा झालेल्या शेतीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. 

अवकाळी पावसात होतं नव्हतं सगळं गेलं;कलिंगड, टोमॅटो, कांदा पिकांची लागली वाट...
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 8:42 PM

अहमदनगर : मागील महिन्यातही अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान केले होते. त्याच दरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांचा संप चालू झाल्यानंतर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वेळाने करण्यास सुरुवात झाली होती. ते संपतात न संपतात तोच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार थैमान घातले आहे. यावेळी गारांसह जोरदार पाऊस झाल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नगर शहरासह जिल्ह्यात काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नगर जिल्ह्यातील काही तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. कलिंगड खरबूज, टोमॅटो आणि कांदा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसासह गारांचा पाऊस होत असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचाही जोरदार फटका बसला होता. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात अनेक झाडंही उन्मळून पडली आहेत.

त्यावेळी भाजीपाला, गहू आणि कांदा या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्ंयांनी उभा पिकांवर नांगर फिरवला होता. तर आताही हाता तोंडाशी आलेल्या पिकांना पावसाचा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडणार असल्याचे बोलले जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह गारांच्या पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसाने अनेक भागातील विजेची बत्तीही गुल केली.

त्यामुळे सायंकाळच्यावेळी अनेक गावांवर अंधाराचे साम्राज्य पसरले होते. अहमदनगर, कर्जत, पारनेरसह जिल्ह्यातील अनेक भागात गारपीटाचा मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे कलिंगड,खरबूज टोमॅटो व कांदा पिकांचे मोठे नुकसान होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आता तरी सरकारने अवकाळी पावसात नुकसा झालेल्या शेतीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.