केडीएमसीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिला आरक्षणासह ओबीसी आरक्षण जाहीर

ओबीसी आरक्षणा निकाल लागल्याने आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांनी हालचाली सुरू केल्यात.कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सुद्धा याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. आज कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदीरात ओबीसी उमेदवारांकरीता आरक्षीत करण्यात येणा:या प्रभागांची सोडत काढण्यात आली. त्यासोबतच यापूर्वी जाहीर केलेलं महिला आरक्षण रद्द करून आज पून्हा नवीन महिला आरक्षण जाहीर करण्यात आले. कोणत्या प्रभागात ओबीसीकरीता आरक्षण पडेल अथवा नाही याविषयीही इच्छूकांमध्ये धाकधूक होती.

केडीएमसीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिला आरक्षणासह ओबीसी आरक्षण जाहीर
कल्याणात कचरा प्रश्न पेटलाImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 4:25 PM

मुंबई : महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा नव्याने आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी)सार्वत्रिक निवडणुकीसाठी(Kalyan Dombivli Mahanagar Municipality Election ) महिला आरक्षणासह ओबीसी आरक्षण(OBC Reservation) सोडत जाहीर करण्यात आली. 44 प्रभागांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण असणार आहे. केडीएमसीत 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, शिवसेनेतच उभी फुट पडली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट असे दोन गट पडले आहेत. यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिके निवडणुक(KDMC Election) अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. त्यातच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अनेक गरवेकांनी शिंदे गटाला पाठिंबा देत ते शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत खरी लढत ही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात पहायला मिळणार आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकूण 44 प्रभाग आहेत. या 44 प्रभागांमधून 133 लोकप्रतनिधी निवडून येणार आहेत. यात 50 टक्के म्हणजे 67 महिला लोक प्रतिनिधी असणार आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गामधून 13 पैकी 7 महिला, अनुसूचित जमाती 4 पैकी 2 महिला असणार आहेत. मागास प्रवर्गमधून 35 पैकी 18 महिला तर उर्वरित म्हणजेच सर्वसाधारण प्रवर्गातून 81 पैकी 40 महिला असणार आहेत.

यापूर्वी जाहीर केलेलं महिला आरक्षण रद्द करून आज पून्हा नवीन महिला आरक्षण जाहीर करण्यात आले

ओबीसी आरक्षणा निकाल लागल्याने आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांनी हालचाली सुरू केल्यात.कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सुद्धा याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. आज कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदीरात ओबीसी उमेदवारांकरीता आरक्षीत करण्यात येणा:या प्रभागांची सोडत काढण्यात आली. त्यासोबतच यापूर्वी जाहीर केलेलं महिला आरक्षण रद्द करून आज पून्हा नवीन महिला आरक्षण जाहीर करण्यात आले. कोणत्या प्रभागात ओबीसीकरीता आरक्षण पडेल अथवा नाही याविषयीही इच्छूकांमध्ये धाकधूक होती.

साधारण प्रभागातून 27 टक्के आरक्षणाच्या प्रमाणात 35 प्रभाग हे ओबीसीसाठी आरक्षित

नव्या पॅनल पद्धतीनुसार 44 पॅनलमध्ये 133 प्रभाग आहे. महापालिकेने यापूर्वीच प्रभागाची अंतिम रचना प्रसिद्ध केली. त्यानंतर अनूसूचित जाती जमातीच्या प्रवर्गासाठी प्रभाग आरक्षित ठेवले होते. त्यानंतर 116 प्रभागाकरीता सर्व साधारण खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या प्रभागारीता आरक्षण काढण्यात आले होते. ही सोडत केली तेव्हा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा न्यायप्रविष्ट होता.आत्ता पुन्हा ओबीसीच्या आरक्षणाला मंजूरी दिली गेल्याने 116 सर्व साधारण प्रभागातून 27 टक्के आरक्षणाच्या प्रमाणात 35 प्रभाग हे ओबीसीसाठी आरक्षित करण्यात येणार आहे. मागील निवडणूकीत ओबीसींकरता 33 प्रभाग निवडणूक लढण्यासाठी उपलब्ध होते.

एकूण 44 प्रभागात 133 लोकप्रतनिधी निवडून येणार असून त्यामध्ये 50 टक्के म्हणजे 67 महिला लोक प्रतिनिधी असणार आहेत. त्यातही अनुसूचित जाती प्रवर्गामधून 13 (पैकी 7 महिला), अनुसूचित जमाती 4 (पैकी 2 महिला ) नागरिकांचा मागास प्रवर्गमधून 35 (पैकी 18 महिला) तर उर्वरित म्हणजेच सर्वसाधारण प्रवर्गातून 81 (पैकी 40 महिला) लोक प्रतिनिधी निवडून येणार आहेत.

मतदार यादीत पुन्हा होणार नाव नोंदणी

मतदार यादी बाबत अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. याबाबत महानगरपालिकेच्या आयुक्ताने निवडणूक आयोगाबरोबर भेट घेतली असून निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर ज्या मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात गेली आहेत त्यांनी फॉर्म नंबर 8, आणि ज्यांची नावं काही कारणास्तव डिलीट झाली आहेत त्यांनी फॉर्म नंबर 6 भरून पुन्हा एकदा मतदार यादीत नाव नोंदविता येतील यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्ताने लवकरात लवकर फॉर्म भरून नावे नोंदणी करावी अस आव्हान केले आहे .

मतदार यादी बाबत अनेक तक्रारी पुढे आल्याने मतदार यादीत पुन्हा होणार नाव नोंदणी

ज्या मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात नावे गेली त्यांनी फॉर्म नंबर 8, आणि ज्यांची नावं काही कारणास्तव डिलीट झाली आहेत त्यांनी फॉर्म नंबर 6 भरावा महानगरपालिकेच्या आयुक्तांचे आव्हान केले आहे .

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.