Kalyan Gramin Assembly Constituency: मनसेचे राजू पाटील यांना कोण देणार तगडं आव्हान
कल्याण ग्रामीण मतदारसंघातून यंदा मनसेने पुन्हा एकदा विद्यमान आमदार प्रमोद (राजू) पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे गटाकडून राजेश मोरे रिंगणात आहेत तर ठाकरे गटाकडून सुभाष भोईर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ २००८ च्या रचनेनंतर निर्माण झाला होता. या मतदारसंघातून सध्या मनसेचे राजू (प्रमोद) पाटील हे विद्यमान आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळेच परतफेड म्हणून महायुतीकडून कल्याण ग्रामीण मध्ये उमेदवार दिला जाणार नाही अशी चर्चा होती. पण तसे झाले नाही. शिवसेना शिंदे गटाने येथे उमेदवार दिलाय. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेकडून पुन्हा एकदा राजू पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीये. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे राजेश मोरे मैदानात आहेत. तर ठाकरे गटाकडून सुभाष भोईर मैदानात आहेत. मतदारसंघात उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली असून छाननी प्रक्रियेत 14 उमेदवार वैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदती अखेर या मतदारसंघात एकूण 14 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारांना 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात वैध ठरलेले उमेदवार
- प्रमोद उर्फ राजू रतन पाटील – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
- दीपक दत्ता खंदारे – बहुजन समाज पार्टी
- सुभाष गणू भोईर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- राजेश गोवर्धन मोरे – शिवसेना
- उज्वला गौतम जगताप – भारतीय जनविकास आघाडी
- विकास प्रकाश इंगळे – वंचित बहुजन आघाडी
- हबीबुर्रहमान ओबेदुर्रहमान खान – पीस पार्टी
- शिवा कृष्णमूर्ती अय्यर – अपक्ष
- नरसिंग दत्तू गायसमुद्रे – अपक्ष
- प्रियांका गजानन मयेकर – अपक्ष
- दिपक रामकिसन भालेराव – अपक्ष
- परेश प्रकाश बडवे – अपक्ष
- चंद्रकांत रंभाजी मोटे – अपक्ष
- अश्विनी अशोक गंगावणे – अपक्ष
2019 चा निकाल
उमेदवार | पक्ष | मतदान |
प्रमोद (राजू) रतन पाटील | मनसे | 93,927 |
म्हात्रे रमेश सुकर्या | शिवसेना | 86,773 |
अमोल धनराज केंड्रे | इतर | 6,199 |
नोटा | इतर | 6,092 |
2014 चा निकाल
उमेदवार | पक्ष | मतदान |
भोईर सुभाष गणू | शिवसेना | 84,110 |
रमेश रतन पाटील | मनसे | 39,898 |
वंडारशेट पुंडलिक पाटील | राष्ट्रवादी कॉंग्रेस | 19,783 |
पाटील शारडा राम | काँग्रेस | 9,213 |
२००९ चा निकाल
उमेदवार | पक्ष | मतदान |
रमेश रतन पाटील | मनसे | 51,149 |
म्हात्रे रमेश सुकर्या | शिवसेना | 41,642 |
रवि पाटील | काँग्रेस | 26,546 |
वानखेडे मारुती सुखाजी | इतर | 1,237 |
विद्याचंद्र दिगंबर दीक्षित | इतर | 994 |