आधी रिपोर्टमध्ये रुग्णाचा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह, नंतर प्लाझ्मा थेरपी करताना एबी पॉझिटिव्ह, खाजगी लॅबचा धक्कादायक प्रताप

कल्याणमध्ये खासगी लॅबने कोरोनाबाधित रुग्णाचा ब्लड रिपोर्ट चुकीचा सांगितल्यामुळे रुग्णाला उपचार मिळण्यात विलंब झाला (Lab gives wrong report of Corona positive Patient in Kalyan).

आधी रिपोर्टमध्ये रुग्णाचा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह, नंतर प्लाझ्मा थेरपी करताना एबी पॉझिटिव्ह, खाजगी लॅबचा धक्कादायक प्रताप
Follow us
| Updated on: Sep 27, 2020 | 8:14 PM

ठाणे : कल्याणमध्ये एका खाजगी लॅबचा धक्कादायक प्रताप उघड झाला आहे. या खासगी लॅबने कोरोनाबाधित रुग्णाचा ब्लड रिपोर्ट चुकीचा सांगितल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे. त्याचबरोबर कोरोनाबाधित रुग्णाला उपचार मिळण्यातही विलंब झाला आहे. याप्रकरणी केडीएमसीचे नगरसेवक कुणाल पाटील यांनी संबंधित लॅब आणि डॉक्टरविरोधात कारवाईची मागणी केली आहे (Lab gives wrong report of Corona positive Patient).

कल्याण पूर्वेतील टाटा नाका परिसरात राहणारे सुरेंद्र साहू यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर कल्याण पूर्वेतील आयुर या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत त्यांच्या उपचारावर 2 लाख रुपये खर्च झाला आहे. मात्र, अद्यापही प्रकृतीत हवी तशी सुधारणा झालेली नाही (Lab gives wrong report of Corona positive Patient).

हेही वाचा : कल्याणमध्ये बोगस डॉक्टरचा सुळसुळाट, मनसेकडून दोन रुग्णालयांचा पर्दाफाश

अखेरीस डॉक्टरांनी सुरेंद्र यांच्यावर प्लाझ्मा थेरपीचा मार्ग अवलंबिण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सुरेंद्र यांची ब्लड टेस्ट करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी सुरेंद्र यांचा ब्लड ग्रुप बी पॉझिटीव्ह असल्याचे सांगत लवकरात लवकर प्लाझ्मासाठी या ब्लड ग्रुपचा ब्लड डोनर उपलब्ध करा, असं सुरेंद्र यांचा मुलगा सुकेशला सांगितलं.

सुरेंद्र यांच्या मुलाने वडिलांचा जीव वाचविण्यासाठी बी पॉझीटीव्ह ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तीचा शोध घेतला. 48 तासानंतर एक डोनर समोर आला. डोनरला घेऊन सुकेश हा दुसऱ्या लॅबमध्ये गेला. यावेळी जेव्हा परत सुरेंद्र यांची ब्लड टेस्टची चाचणी करण्यात आली. तेव्हा सुरेंद्र यांचा ब्लड ग्रुप हा बी पॉझीटीव्ह नसून एबी पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले.

ही धक्कादायक बाब सुकेश साहू यांनी नगरसेवक कुणाल पाटील यांना सांगितली. कुणाल पाटील यांनी त्वरित हेल्थकेअर लॅब चालकाशी संपर्क साधला. त्यावेळी हेल्थ केअर लॅबचे चालक राकेश शुक्ला यांनी चूक मान्य केली. याप्रकरणी नगरसेवक कुणाल पाटील यांनी संबंधित लॅब चालक आणि जबाबदार असलेल्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

संबंधित बातम्या : 

मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाईच्या नावाखाली लुबाडण्याचा धंदा, केडीएमसीच्या क्लीन मार्शलला अटक

Kalyan Breaking | कल्याणमध्ये वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा मृत्यू

कल्याणमध्ये वृद्ध महिलेचा अ‍ॅम्ब्युलन्स अभावी मृत्यू, रुग्णवाहिका न मिळाल्याने पोलीस व्हॅनमधून रुग्णालयात

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.