कल्याण लोकसभेतील सस्पेन्स संपला, देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला उमेदवार

devendra fadnavis: भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमधील उमेदवार जाहीर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली.आता ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर राणे आणि महायुतीचे श्रीकांत शिंदे यांच्यात लढत होणार आहे.

कल्याण लोकसभेतील सस्पेन्स संपला, देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला उमेदवार
देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Apr 06, 2024 | 10:41 AM

गेल्या काही दिवसांपासून कल्याणमधील महायुतीचा उमेदवार कोण असणार? ही चर्चा सुरु होती. भाजप आणि शिवसेनेत वाद सुरु होता. शिवसेना कल्याण लोकसभेवरुन आपला दावा सोडण्यास तयार होत नव्हती. स्थानिक भाजप कार्यकर्ते विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना मदत करण्यास तयार नव्हते. यामुळे अजूनही कल्याण लोकसभेचा निर्णय जाहीर झाला नव्हता. अखेर कल्याणधील सस्पेन्स संपला आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार जाहीर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे आता कल्याणमध्ये दुहेरी लढत होणार आहे. ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर राणे आणि महायुतीचे श्रीकांत शिंदे यांच्यात लढत होणार आहे.

वादावर पडदा पडणार

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीत संपूर्ण जागा वाटप अजूनही झालेले नाही. तिन्ही पक्षांत दिल्ली आणि मुंबईत चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्यानंतर कल्याण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे आणि सिंधुदुर्गचा निर्णय अद्यापही जाहीर झालेले नाही. परंतु आता कल्याणमधील वादावर पडदा पडला आहे. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असणार आहेत.

भाजपची शुक्रवारी झाली होती बैठक

शुक्रवारी कल्याण पूर्वमध्ये भाजपची बैठक झाली होती. त्या बैठकीत श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला होता. कल्याण लोकसभेसाठी दुसरा उमेदवार द्यावा, श्रीकांत शिंदे यांचा काम करणार नाही, असा निर्णय या बैठकीत घेतला गेला होता. त्यानंतर आता शनिवारी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय जाहीर करत भाजप कार्यकर्त्यांना चपराक दिली आहे. महायुतीचा उमेदवार कल्याणमधून निवडून येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

भाजप जिल्हाध्यक्ष म्हणाले होते…

लोकसभा मतदारसंघ भाजपाला मिळावा अशी मागणी करणे यात गैर काही नाही. महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल तो प्रचंड मतांनी निवडून येईल. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासोबत कल्याण पूर्व येथील भाजपाचेच नव्हे तर सगळेच भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, असे भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी सांगितले होते. आता देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय जाहीर केल्यामुळे भाजपमधील हा वाद मिटण्याची चिन्ह आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.