निवडणुकीनंतर राजकीय समीकरणात बदल, मनसे आणि ठाकरे गटाचे दोन्ही माजी आमदार एकत्र, कारण…

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले, मात्र अनेकांनी या निकालानंतर ईव्हीएमववर आक्षेप घेतला. त्यातच आता कल्याण ग्रामीण विधानसभा मतदान क्षेत्रात दोन माजी आमदारांनी पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज केला आहे.

निवडणुकीनंतर राजकीय समीकरणात बदल, मनसे आणि ठाकरे गटाचे दोन्ही माजी आमदार एकत्र, कारण...
Follow us
| Updated on: Dec 01, 2024 | 9:47 AM

Kalyan Rural Assembly Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर 8 दिवस उलटले तरी सरकार स्थापन झालेले नाही. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले, मात्र अनेकांनी या निकालानंतर ईव्हीएमववर आक्षेप घेतला. त्यातच आता कल्याण ग्रामीण विधानसभा मतदान क्षेत्रात दोन माजी आमदारांनी पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज केला आहे. तसेच मनसेचे राजू पाटील यांनीही पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे आता निवडणुकीनंतर मनसे आणि ठाकरे गटाचे दोन्ही माजी आमदार एकत्र आल्याने राजकीय समीकरण बदलणार का, अशी चर्चा रंगली आहे.

व्हीव्हीपॅट यंत्रातील मते पुन्हा मोजण्याची मागणी

कल्याण ग्रामीणमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सध्या या निकालाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. दोन माजी आमदार, मनसेचे राजू पाटील आणि ठाकरे गटाचे सुभाष भोईर यांनी पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज दाखल केला आहे. शिंदे गटाचे राजेश मोरे यांचा या निवडणुकीत विजय झाला. या धक्कादायक विजयामुळे मतदारसंघातील निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. व्हीव्हीपॅट यंत्रातील मते पुन्हा मोजण्याची मागणी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुढील राजकीय समीकरणे कशी बदलतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ

कल्याण ग्रामीण मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. मात्र, ठाकरे गटाचे सुभाष भोईर आणि मनसेचे राजू पाटील यांनी या निकालाला आव्हान दिले आहे. या मतमोजणी प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, दोन्ही माजी आमदारांनी एकत्र येऊन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे व्हीव्हीपॅट यंत्रातील मते पुन्हा मोजण्यासाठी अर्ज केला आहे. राजू पाटील यांनी 22 तर सुभाष भोईर यांनी 5 व्हीव्हीपॅट यंत्रांची मते मोजण्याची मागणी केली आहे. या प्रक्रियेसाठी लागणारा खर्चही त्यांनी भरला आहे.

निकालावरून वाढले प्रश्न

कल्याण ग्रामीणमध्ये ठाकरे गट आणि मनसे यांच्यात जोरदार लढत होईल, असे भाकीत वर्तवण्यात येत होते. मात्र, राजेश मोरे यांनी बाजी मारल्याने अनेक मतदार आणि राजकीय तज्ज्ञ चकित झाले. यावरून सोशल मीडियासह इतर व्यासपीठांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणेबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.