Mumbai Power Cut ! मुंबईची बत्ती गुल; कंगनाचा ठाकरे सरकारवर निशाणा

अभिनेत्री कंगना रणौतशिवाय प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनीही ट्विट केलं आहे. संपूर्ण मुंबईत वीज गायब झालीय. हे अनपेक्षित आहे. एखाद्या बोगद्यात असावं अशा पद्धतीने मुंबई अंधारात गेलीय, अशी टीका शोभा डे यांनी ट्विटमधून केली आहे. हे ट्विट करताना त्यांनी मुंबई महापालिका आणि टाटा पॉवरला टॅगही केलं आहे.

Mumbai Power Cut ! मुंबईची बत्ती गुल; कंगनाचा ठाकरे सरकारवर निशाणा
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 2:18 PM

मुंबई: संपूर्ण मुंबई-ठाण्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने मुंबई-ठाणेकर त्रस्त झालेले असतानाच नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून मीम्सच्या माध्यामातून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. नेटवर मीम्सचा पाऊस पडत असतानाच अभिनेत्री कंगना रणौतनेही या संधीचा फायदा घेत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.(kangana ranaut slams maharashtra government)

वीज पुरवठा खंडित झाल्याने कंगनाने एक ट्विट केलं असून या ट्विटमध्ये शिवसेना नेते संजय राऊत आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा फोटोही पोस्ट केला आहे. त्यानंतर या फोटोला कंगनाने कॅप्शन दिली असून ‘मुंबईमध्ये Powercut, अशावेळी महाराष्ट्र की सरकार क-क-क……कंगना’, अशी खोचक टीका कंगनाने केली आहे. तर, अभिनेते अनुपम खेर यांनीही ‘बत्ती गुल’ असं ट्विट करत महाराष्ट्र सरकारला डिवचले आहे. अरमान मलिकनेही वीज गेल्याचं म्हटलं आहे.

या शिवाय प्रसिद्ध लेखिका आणि स्तंभलेखिका शोभा डे यांनीही ट्विट केलं आहे. संपूर्ण मुंबईत वीज गायब झालीय. हे अनपेक्षित आहे. एखाद्या बोगद्यात असावं अशा पद्धतीने मुंबई अंधारात गेलीय, अशी टीका शोभा डे यांनी ट्विटमधून केली आहे. हे ट्विट करताना त्यांनी मुंबई महापालिका आणि टाटा पॉवरला टॅगही केलं आहे.

दरम्यान, आज संपूर्ण मुंबईत वीज पुरवठा खंडित झाल्याने मुंबई अंधारात गेली होती. महापारेषणच्या सर्किट केंद्राचे देखभाल दुरूस्तीचे काम सुरू होते. मात्र अचानक बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सोमोरे जावे लागले, असं मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केलं. दरम्यान, वीज पुरवठा खंडित झाल्याने त्याचा परिणाम मुंबईच्या लोकलवर देखील झाला. त्यामुळे मुंबईकडे कामावर येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रचंड खोळंबा झाला. या चाकरमान्यांना सुमारे दोन ते अडीच तास लोकलमध्ये खोळंबून राहावे लागले होते. त्यामुळे अनेक प्रवासी संतापही व्यक्त करत होते. (kangana ranaut slams maharashtra government)

संबंधित बातम्या:

mumbai power cut ! मुंबई-ठाण्यातील बत्तीगुल झाल्याने रेल्वे, इंटरनेट ठप्प; रुग्णालयांनाही फटका

Mumbai Power Cut: मुंबईची बत्ती गुल; कार्यालये आणि रेल्वे वाहतूक ठप्प

Mumbai Power Cut | मुंबई-ठाणे थांबले; पहिल्यांदाच सर्वाधिक वेळ बत्तीगुल

(kangana ranaut slams maharashtra government)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.