कन्नड, चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळं शेतीचं मोठं नुकसान, हर्षवर्धन जाधवांचा आंदोलनाचा इशारा

सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झालाय. केळी, मोसंबी, कांदा, कापूस, अद्रक पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. विनायक पाटील या शेतकऱ्याची 10 एकरवरील तीन वर्षाची मोसंबीची बाग वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

कन्नड, चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळं शेतीचं मोठं नुकसान, हर्षवर्धन जाधवांचा आंदोलनाचा इशारा
हर्षवर्धन जाधव, माजी आमदार
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 6:09 PM

कन्नड : सोमवारी रात्री झालेल्या पावसानं कन्नड तालुक्यातील बेलदरीतील पाझर तलाव फुटला. त्यामुळे धरणक्षेत्रातील 100 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर 11 गावात पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. त्यानुसार आता ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी विभागाच्या माध्यमातून पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची मागणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलीय. जाधव यांनी गुरुवारी तहसील कार्यालयावर आंदोलनाचा इशाराही दिला आहे. (crop damage due to heavy rains in Kannad, Chalisgaon taluka,  Harshvardhan Jadhav warns of agitation)

सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झालाय. केळी, मोसंबी, कांदा, कापूस, अद्रक पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. विनायक पाटील या शेतकऱ्याची 10 एकरवरील तीन वर्षाची मोसंबीची बाग वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून मदतीचं आश्वासन

दरम्यान, कन्नड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल, असं औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी म्हटलंय. काल रात्री नुकसानाची पाहणी करताना शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घातला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना आधार देत नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. तसंच घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांना नवीन घर देण्याचं आश्वासनही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी दिलंय.

हर्षवर्धन जाधवांचा आंदोलनाचा इशारा

दुसरीकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, अशी मागणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलीय. शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी उद्या तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांना घेऊन मोर्चा काढणार असल्याचा इशारा जाधव यांनी दिलाय. बेलदरी गावातील धरणाकडे शासनाचं दुर्लक्ष झालं. आतापर्यंत सरकारचा निधी मिळाला नाही. आता सरकारनं जर मदत केली तर निवडणुकीत आम्ही त्यांना मदत करु, अशी ऑफरच हर्षवर्धन जाधव यांनी महाविकास आघाडीला दिलीय. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचं जाधव म्हणाले.

चाळीसगाव तालुक्यात शेतीचं मोठं नुकसान

चाळीसगाव तालुक्यात झालेल्या पावसाने शेतकरी व्यवसायिक यांचं मोठा प्रमाणावर नुकसान झालं आहे. ऊस, मका, कापसाचं पीक वाहून गेलं. तर डोंगरी नदीच्या उपनदीने वाकडी परिसरात थैमान घातलं होतं. त्यात अनेक जनावरं वाहून गेली आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. आता शासनाच्या मदतीची अपेक्षा या शेतकऱ्यांना आहे. सरकारची मदत ती मिळऊन देण्यासाठी केवळ पंचनामे करून चालणार नाहीत. तर आमदार, खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी भरीव मदत मिळवून देण्याची गरज असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

इतर बातम्या :

सोयाबीनवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव; चंद्रपूरमध्ये शेतकऱ्यांवर मोठं संकट

यूरीयाची चढ्या दरानं विक्री, शेतकऱ्याकडून भांडाफोड; कृषी विभागात खळबळ, कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द

crop damage due to heavy rains in Kannad, Chalisgaon taluka, Harshvardhan Jadhav warns of agitation

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.