Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैद्यकीय क्षेत्रासाठी आनंदाची बातमी, नवं PPE किट तयार; पाहा पहिला ‘Photo’

कोरोनासह जगभर अनेक प्रकारच्या विषाणूजन्य साथीच्या रोगांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला हा संसर्ग टाळण्यासाठी संबंधित आजारावर उपचार करताना डॉक्टर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई कीट घालणे अनिवार्य आहे.

वैद्यकीय क्षेत्रासाठी आनंदाची बातमी, नवं PPE किट तयार; पाहा पहिला 'Photo'
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 1:15 PM

कराड : कोरोनासह जगभर अनेक प्रकारच्या विषाणूजन्य साथीच्या रोगांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला हा संसर्ग टाळण्यासाठी संबंधित आजारावर उपचार करताना डॉक्टर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई कीट घालणे अनिवार्य आहे. मात्र असा पीपीई कीट सलग 6– 6 तास घालून सेवा देणे डॉक्टरांसाठी मोठे त्रासाचे ठरते. कारण पूर्णपणे पॅकबंद असलेल्या पीपीई कीटमध्ये हवेचे योग्य संतुलन होत नसल्याने घामेजलेल्या अवस्थेत सेवासुश्रुषा करताना डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होते, तसे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. (Karad Directorate of Krishna Medical Research have successfully researched reusable air conditioned PPE kits)

आरोग्य कर्मचाऱ्यांचा हा त्रास कमी व्हावा यासाठी पीपीई कीटमध्ये हवा खेळती ठेवणाऱ्या उपकरणाचे संशोधन करण्यात आले आहे. कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे संशोधन संचालनालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून संशोधित करण्यात आलेल्या या अनोख्या उपकरणामुळे पीपीई कीटमध्ये हवा खेळती राहणार असून, संबंधित पीपीई कीट परिधान करणाऱ्या डॉक्टरांच्या शरीराचे तापमान सामान्य राहण्यास मदत होणार आहे.

यामुळे पीपीई कीटचा वापर त्यांच्यासाठी सुसह्य ठरणार आहे. मुख्य म्हणजे या उपकरणात 0.1 मायक्रॉन आकाराचा हेपा फिल्टर बसविण्यात आला आहे. कोविड-१९ चा विषाणू हा यापेक्षा मोठ्या आकाराचा असल्याने त्याचा शिरकाव या उपकरणाद्वारे पीपीई कीटमध्ये होऊ शकत नाही.

हे उपकरण वजनाला हलके असून, हाताळण्यास सोपे आहे. त्यामुळे डॉक्टरांसह नर्सेस, वॉर्ड बॉय व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना हे उपकरण आरामदायी पद्धतीने वापरता येणार असून, विषाणूजन्य साथीच्या आजारांच्या काळात उपचार करताना हे उपकरण त्यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेस भोसले यांनी सातत्याने समाजपयोगी संशोधनाला चालना दिली असून, आरोग्य क्षेत्रातील संशोधनाचा लाभ सामान्यातील सामान्य नागरिकाला व्हावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाने विविध प्रकारची संशोधने केली असून, त्यांची देशपातळीवर दखल घेण्यात आली आहेत.

कृष्णा अभिमत विद्यापीठाचे अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी. के. अग्रवाल, यांनी हि माहिती संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. (Karad Directorate of Krishna Medical Research have successfully researched reusable air conditioned PPE kits)

संबंधित बातम्या – 

Sanjay Rathod Pohradevi visit LIVE | संजय राठोड जगदंबामातेसमोर लीन

एकाच शाळेतील 40 विद्यार्थ्यांना कोरोना, 320 विद्यार्थी, 10 शिक्षक, 20 कर्मचारी क्वारंटाईन, महाराष्ट्राला हादरे सुरुच

कोरोनाचे नियम मोडल्यास गुन्हे दाखल होणार, हॉटेल, लग्न समारंभांवर करडी नजर; ठाणे पालिका आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये!

(Karad Directorate of Krishna Medical Research have successfully researched reusable air conditioned PPE kits)

'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर
'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर.
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल.
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?.
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर...
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर....
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?.
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट.
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण...
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण....
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्.
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल.
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी.