Belgaum | कर्नाटक पोलिसांची अरेरावी, बेळगावमधील मराठी तरुणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल
कर्नाटक पोलिसांनी बेळगावमधील मराठी भाषिक तरुणांवर राजद्रोहाचा 123 (अ) गुन्हा दाखल केला आहे. कर्नाटक सरकारच्या या अरेरावीचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाल्यानंतर त्याचा बेळगावात धर्मवीर संभाजी चौक येथे निषेध केला होता.
बेळगाव : कर्नाटक पोलिसांनी बेळगावमधील मराठी भाषिक तरुणांवर राजद्रोहाचा 123 (अ) गुन्हा दाखल केला आहे. कर्नाटक सरकारच्या या अरेरावीचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाल्यानंतर बेळगावात धर्मवीर संभाजी चौक येथे निषेध केला होता.
23 हून अधिक जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार बेळगामध्ये मराठी भाषिक तरुणांवर देशद्रोहासाठी लावण्यात येणारे भारतीय दंड संहितेचे 123 (अ) हे कलम लावण्यात आले आहे. या कलमांतर्गत मराठी तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खडेबाजार पोलीस स्थानक, कॅम्प पोलीस स्थानक ,टिळकवाडी पोलीस स्थानक व मार्केट पोलीस स्थानकामध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी एकूण 38 मराठी भाषिकांना अटक करून कारागृहात टाकले आहे. तर 23 हून अधिक जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
माजी महापौर सरिता पाटील यांच्यावरदेखील कारवाई
या कारवाईत बेळगाव पोलिसांनी बेळगावच्या माजी महापौर तसेच शिवसेनेचे बेळगावचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर यांच्यासहित अनेकांवर कारवाई केली आहे. यामध्ये श्री राम सेना हिंदुस्तान अध्यक्ष रमाकांत कुंडुसकर, शिवसेना बेळगाव जिल्हा अध्यक्ष प्रकाश शिरोळकर, महाराष्ट्र्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, माजी महापौर सरिता पाटील यांचा समावेश आहे. तर कर्नाटक सरकारच्या या अरेरावीचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. महाराष्ट्रात कर्नाटक सरकार आणि पोलिसांचा निषेध केला जातोय.
नेमकं काय घडलं होतं ?
मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. धक्कादायक बाब म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी विटंबना ही छोटी गोष्ट असल्याचं वक्तव्य केलं होतं. या प्रकारामुळे राज्यात शिवसेना आणि शिवप्रेमी चांगलीच आक्रमक झाली होती.
इतर बातम्या :