Chhatrapati| कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बांगड्या भेट; नाशिकमध्ये शिवजन्मोत्सव समितीतर्फे शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक
नाशिक शिवजन्मोत्सव समितीतर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना दुग्धभिषेक करण्यात आला. त्यानंतर पंचवटी, नाशिकरोड, सातपूर, सिडको, पाथर्डी फाटा, सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धभिषेक करण्यात आला.
नाशिकः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत मंगळवारी नाशिकमध्ये शिवजन्मोत्सव समितीकडून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि कानडीगांचा निषेध करण्यात आला. कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांचाही यावेळी समाचार घेण्यात आला. महिलांनी आक्रमक होत बोम्मई यांना थेट बांगड्याची भेट दिली.
बोम्मईंचा निषेध
कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ शुक्रवारी रात्री व्हायरल झाला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे, असे धक्कादायक विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले होते. या विधानाच्या निषेधार्थ शिवजन्मोत्सव समितीतर्फे मंगळवारी शहरात ठिकठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. यापूर्वी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसनेही ठिकाठिकाणी असेच आंदोलन केले होते. आजही कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला गेला.
मेकअपचे साहित्य भेट
नाशिक शिवजन्मोत्सव समितीतर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना दुग्धभिषेक करण्यात आला. त्यानंतर पंचवटी, नाशिकरोड, सातपूर, सिडको, पाथर्डी फाटा, सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धभिषेक करण्यात आला. अनेक तरुणांनी कर्नाटक सरकार आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना बांगड्या, टिकली साडीसह मेकअपचे साहित्य भेट देत त्यांच्या विधानाचा निषेध नोंदवला.
तीव्र रोष व्यक्त
कर्नाटक सरकारकडून वारंवार मराठी भाषकांना दुजाभावाची वागणूक देण्यात येत आहे. त्यात शिवरायांच्या पुतळ्याची समाजकंटकांनी केलेली विटंबना, त्यावर मुख्यमंत्री बोम्मई यांचे वादग्रस्त वक्तव्य. याबद्दल समाजात तीव्र रोष आहे. त्यात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 200 हून अधिक कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून बेकायदा अटक केलीय. त्यांना बेदम मारहाण केली जातीय, लाठीमार केली जातीय. यावर महाराष्ट्रातील भाजपचे संवेदनशील नेते काय करत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची भाषा करत आहेत. त्यांनी बंदी घालून दाखवावी, असे आव्हान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. येणाऱ्या काळात हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.
इतर बातम्याः