Karnataka : चित्रदुर्गमध्ये कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा ध्वज जाळला, वाद पुन्हा पेटणार?

कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक रक्षण वेदिकेचा लाल-पिवला ध्वज जाळला होता. त्याचेच पडसाद आज कर्नाटकमधील चित्रदुर्गमध्ये उमटले आहेत. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा ध्वज जाळला आहे.

Karnataka : चित्रदुर्गमध्ये कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा ध्वज जाळला, वाद पुन्हा पेटणार?
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 10:50 PM

बेळगाव : बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशनला सुरुवात झाली आणि महाराष्ट्र एकीकरण समितीकडून महामेळावा आयोजित करण्यात आला. त्यावेळी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी दीपक दळवी यांच्यावर काळी शाही फेकली, त्यानंतर हा वाद सुरू झाला. मंगळवारी बेळगाव बंद करण्यात आले होते. आता कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्याता आहे.

शिवसेनेला कर्नाटक रक्षण वेदिकेचे प्रत्युत्तर

कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक रक्षण वेदिकेचा लाल-पिवला ध्वज जाळला होता. त्याचेच पडसाद आज कर्नाटकमधील चित्रदुर्गमध्ये उमटले आहेत. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा ध्वज जाळला आहे. त्यामुळे सीमाभागातील तणाव पुन्हा वाढला आहे. या घटनेनंतर शिवसैनिक आता आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. अनेकदा शिवसैनिकांनी बेळगावात जाऊन कानडिगांना धडा शिकवला आहे.

सीमाभागात अनेकदा वाद, तणाव

बेळगाव कर्नाटकला मिळाल्यापासून हा वाद सुरू आहे. बेळगाव कर्नाटकात गेल्यापासून सीमाभागातील मराठी बांधव 1 मे दिवस काळा दिवस म्हणून साजरा करतात. त्यामुळे मराठी विरुद्ध कानडी असा संघर्ष अनेकदा पहायला मिळाला आहे. हा वाद राजकारणातही उतरला आहे. कर्नाटकातील अनेक नेते बेळगाववरून अनेकदा महाराष्ट्रावर टीका करताना दिसून येतात. तर राज्यातल्या नेत्यांकडूनही त्यांना वेळोवेळी प्रत्युत्तर देण्यात आले आहे. बेळगाव महापालिकेवरील झेंड्यावरूनही अनेकदा वाद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, कधी झेड्यावरून वाद, तर कधी सीमाभागातील प्रश्नांवरून वाद, हा वाद सीमाभागातील मराठी बांधवांना नवा नाही. मात्र त्यांना आजही आशा आहे ती महाराष्ट्रात सामील होण्याची. त्यांची ही इच्छा इतक्या वर्षातही पूर्ण झाली नाही.

मोदींचा ‘ग्लोबल’ डंका; बलाढ्य नेत्यांना धोबीपछाड, जागतिक क्रमवारीत वरचं स्थान

Omicron Variant : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नवे निर्बंध; वाचा नियमावली

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील 63 पैकी तब्बल 38 इमारतींना OC नाही, कारवाईची मागणी

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.