धनंजय मुंडेंची गँग औरंगजेबापेक्षा…करुणा मुंडे यांचे हादरवून टाकणारे गौप्यस्फोट; नेमकं काय म्हणाल्या?
करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची औरंगजेबाशी तुलना केली आहे.

Dhananjay Munde And Karuna Munde : धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासाखेच आहेत, असे माझगाव सत्र न्यायालयाने म्हटले आहे. माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिले होते. मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने 5 एप्रिल रोजी असे मत न्यायालयाने व्यक्त केले होते. त्यानंतर आता करुणा मुंडे यांनी समोर येत न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मी ठेवलेली बाई नाही. मला दोन मुलं आहेत. 25-50 कोटी रुपये घेऊन मी शांत बसेल असे मुंडे यांना वाटले होते, असेही त्या म्हणाल्या. सोबतच त्यांनी धनंजय मुंडे यांची गँग औरंगजेबापेक्षा क्रूर आहे, असा दावा त्यांनी केलाय. करुणा मुंडे ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होत्या.
आमचं 1998 साली लग्न झालं
“आमचं लग्नच होतं, हे न्यायालयाने सांगितलेलं आहे. मी त्यांची बायकोच नाही असं धनंजय मुंडे यांचं लग्न आहे. आमच्यात 1996 सालापासून नातं आहे. आमचं 1998 साली लग्न झालं आहे. अगोदर मला म्हाडाच्या रुममध्ये ठेवलं. लग्नानंतर आम्ही जून 2023 मध्ये पहिल्यांदा घर घेतलं. न्यायाधीशांनीही त्यांच्या वकिलांना तेच सांगितलं. तुम्ही एवढी वर्षे गप्प का होते? असे न्यायाधीशांनी विचारले,” अशी माहिती करुणा मुंडे यांनी दिली.
मी 25 ते 50 कोटी रुपये घेऊन शांत राहील असे त्यांना वाटले
तसेच, “मी मंत्री आहे, काहीही होऊ शकतं, असं त्यांना वाटत होतं. माझी लढाऊ प्रवृत्ती आहे, हे माझ्या नवऱ्याला माहिती होते. मात्र त्यांच्या गँगला वाटत होते की मी 25 ते 50 कोटी रुपये घेऊन शांत राहील असे त्यांना वाटले होते. मात्र मी नाचणारी-गाणारी महिला नाही. मी ठेवलेली बाई नाही. मला दोन मुलं आहे. त्या दोन मुलांवर मी मनापासून प्रेम केलेलं आहे,’ असंही त्यांनी म्हटलं. सोबतच मला माझ्या नवऱ्यासारख्या जीवनपद्धतीप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे, हे न्यायाधीशांनी म्हटलं आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
धनंजय मुंडे, त्यांच्या गुंडा गँगची औरंगजेबापेक्षा क्रूर वृत्ती
“काय काय त्याग केलेला आहे, हे कोर्टात अजूनही देणे बाकी आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण हे फारच क्रूर आहे. क्रूर वृत्तीने ही हत्या झालेली आहे. न भूतो ना भविष्यती ही घटना आहे. औरंगजेबावरती एक चित्रपट आला आहे. मात्र औरंगजेबापेक्षा क्रूर वृत्ती ही धनंजय मुंडे आणि त्यांच्या गुंडा गँगची आहे. ही गँग खूप मोठी आहे. त्यांची सर्व कामे ही गँगमार्फतच चालतात. सुंब जळालं पण पीळ गेला नाही, अशी त्यांची प्रवृत्ती आहे,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
आईने आत्महत्या केली, बहिणीवर बलात्कार झाला
“माझ्या आईने आत्महत्या केलेली आहे. मी 2008 साली वीष प्राशन केलं होतं. त्यानंतर मी पाच दिवस मी सीएचएल अपोलो रुग्णालयात भरती होते. माझ्या बहिणीसोबतही बलात्कार झालेला आहे. आज माझ्यावर ज्या पद्धतीने दबाव टाकला जात आहे, त्याच पद्धतीने माझ्या आईवरही दबाव टाकण्यात आला होते. याच दबावामुळे माझ्या आईने आत्महत्या केली होती,” असाही आरोप करुणा मुंडे यांनी केला.