Karuna Sharma | पक्षप्रवेशाच्या ऑफर नाकारल्या, करुणा शर्मांचा स्वतःचा पक्ष, नावही जाहीर
अहमदनगरमध्ये जानेवारी अखेरीस मोठा मेळावा घेऊन पक्षाचे चिन्ह, पक्षाचा झेंडा, बोधचिन्ह आणि निवडणूक लढवण्या संदर्भातली आचारसंहिता जाहीर केली जाणार असल्याची माहिती करुणा शर्मा यांनी दिली आहे.
अहमदनगर : करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी नवीन पक्षाची घोषणा केली आहे. अहमदनगरमध्ये (Ahmednagar) सभा घेऊन लवकरच त्या पक्षाची स्थापना करणार आहेत. शिवशक्ती सेना (Shiv Shakti Sena) असं नवीन पक्षाचं नाव असल्याचं करुणा शर्मांनी जाहीर केलं.
“अनेक पक्षांनी मला प्रवेश करण्याचं आमंत्रण दिलं होतं, मात्र मी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या सारख्या अनेक मंत्र्यांच्या पत्नींवर अन्याय होत आहे. त्यातील अनेक महिला माझ्या संपर्कात आहेत” असा दावाही करुणा शर्मांनी केला.
पक्षाचे चिन्ह आणि झेंडा पुढच्या महिन्यात
अहमदनगरमध्ये जानेवारी अखेरीस मोठा मेळावा घेऊन पक्षाचे चिन्ह, पक्षाचा झेंडा, बोधचिन्ह आणि निवडणूक लढवण्या संदर्भातली आचारसंहिता जाहीर केली जाणार असल्याची माहिती करुणा शर्मा यांनी दिली आहे.
परळीतून निवडणूक लढण्याची चिन्हं
बीडमधील परळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा मानस करुणा शर्मा यांनी व्यक्त केल्याचीही चर्चा आहे. तसं झाल्यास विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांना शर्मांचं आव्हान असेल.
‘आमदारकीची निवडणूकही लढवणार’
काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची करुणा शर्मा यांनी भेट घेतली होती. त्यानंतर करुणा यांनी आपण समाजसेविका आहोत. पुढे राजकारणातही येणार, असं सांगितलं होतं. इतकंच नाही तर आपल्याला आमदारकीची निवडणूक लढवायची असल्याचा मानसही करुणा यांनी बोलून दाखवला होता.
संबंधित बातम्या :
दत्तामामांचे ‘हुश्श..’, पुणे जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत राज्यमंत्री भरणेही बिनविरोध
आदित्य ठाकरेंना धमकी, मी स्वत: कर्नाटकात जातो, फडणवीसांचा शब्द, रजा अकादमी, सनातनवरही मोठं वक्तव्य
कालच्या वादावादीनंतर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगल्या गुजगोष्टी…!