देवेंद्र फडणवीसांनी फिरवली जादूची कांडी, कसबा पोटनिवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाचा पोटनिवडणूकीत सर्व पक्ष आपली ताकद लावताना दिसत आहेत. भाजपने हेमंत रासने यांना उमदेवारी दिल्याने नाराजीनाट्य पाहायला मिळालं. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जादूच्या कांडीसारखा एक फोन फिरवला आणि सारी गणित पुन्हा जुळून आलीत.

देवेंद्र फडणवीसांनी फिरवली जादूची कांडी, कसबा पोटनिवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 4:18 PM

पुणे : पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत सर्व पक्ष आपली ताकद लावताना दिसत आहेत. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या घरातच उमेदवारी दिली जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. मात्र भाजप पक्षश्रेष्ठींनी वेगळा निर्णय घेतल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. हेमंत रासने यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक यांनी नाराजी बोलून दाखवली होती. रासने यांच्या अर्जभरण्याच्या वेळी टिळक कुटुंबातील कोणीच उपस्थित नव्हते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जादूची कांडी फिरवल्याचं दिसत आहे.

हेमंत रासने यांनी सकाळी उमेदवारीचा अर्ज भरला होता. परंतु अर्ज भरताना टिळक कुटुंबातील कोणीच उपस्थित नव्हतं. त्यामुळे टिळक कुटुंब नाराज असल्याचं उघडपणे दिसून आलं. कुणाल टिळक आणि शैलेश टिळक यांनी आपल्या घरात उमेदवारी यायला हवी अशी मागणी केली होती. मात्र देवेंद्र फडणवीसांनी शैलेश टिळक यांना फोन करत मनधरणी केली. नाराजी दूर करून मैदानात उतरा असं आवाहन फडणवीसांनी केलं.

देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतर भाजपने निवडणुकीसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीमध्ये टिळक कुटंबाने उपस्थिती लावली. या बैठकीला शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांनी हजेरी लावली. एकंदरित या नाराजीनाटयावर पडदा पडला आहे. सोमवारी दुपारी भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेतली. टिळक परिवाराला उमेदवारी द्यायला तयार आहोत मात्र महाविकास आघाडीने उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी मागे घ्यावी, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल होत आहे. कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा नंबर गेला, आता बापटांचा नंबर का? समाज कुठवर सहन करणार…कसब्यातील एक जागृत मतदार अशा आशयाचं पोस्टर चर्चेत आहे. ब्राह्णण समाजाला तिकीट न देता भाजपने स्वत: नाराजी ओढून घेतल्याच्या प्रतिक्रिया मतदारांनी दिल्या आहेत.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.