AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : पहलगाम हल्ला : पहलगाम हल्ला : दिवंगत कौस्तुभ गनबोटे यांच्या घरी मुख्यमंत्री दाखल

| Updated on: Apr 27, 2025 | 9:21 AM

Kashmir Pahalgam Terror Attack LIVE News and Updates in Marathi : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममधून संशयितांना अटक करण्यात आली आहे. बंदुका आणि काडतुसांसह त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हे दोघे दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा संशय आहे.

LIVE : पहलगाम हल्ला : पहलगाम हल्ला : दिवंगत कौस्तुभ गनबोटे यांच्या घरी मुख्यमंत्री दाखल

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममधून संशयितांना अटक करण्यात आली आहे. बंदुका आणि काडतुसांसह त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हे दोघे दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा संशय आहे. पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांचं घर उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. शुक्रवारपासून एकूण 5 दहशतवाद्यांची 7 घरं जमीनदोस्त करण्यात आली आहेत. पुलवामा, कुलगाम, त्राल, बिजबेहरा, शोपियानमध्ये कारवाई करण्यात आली. भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे कुटुंबाची घेण्याची शक्यता आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आज त्यांच्या घरी जाऊन नड्डा आणि फडणवीस सांत्वन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Apr 2025 07:50 PM (IST)

    परभणीला अवकाळी पावसाचा तडाखा

    परभणीला अवकाळी पावसाचा तडाखा

    सायंकाळाच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस

    उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

    मात्र पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

  • 26 Apr 2025 06:45 PM (IST)

    जुन्या येवल्यात पोलीस ठाण्याच्या रिकाम्या इमारतीला आग

    जुन्या येवल्यात पोलीस ठाण्याच्या रिकाम्या इमारतीला आग

    आगीत एक रूम जळून खाक… स्थानिकांनी टाकलेल्या कचऱ्याला आग लागल्याने पोलीस ठाण्याच्या इमारतीला आग लागल्याची माहिती अग्निशामक बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात

  • 26 Apr 2025 06:08 PM (IST)

    गोंदियात अवकाळी पावसाची हजेरी, उकाड्यापासून दिलासा

    गोंदिया जिल्ह्यात दुपारी अचानक ढगाळ वातावरण निर्माण झालं व काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, फळबागा आणि भाज्याचं मोठं नुकसान झालं, मात्र दुसरीकडे नागरिकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.

  • 26 Apr 2025 03:45 PM (IST)

    पहलगाम हल्ला : दिवंगत कौस्तुभ गनबोटे यांच्या घरी मुख्यमंत्री दाखल

    पुणे येथील व्यवसायिक कौस्तुभ गनबोटे यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांत्वनासाठी दाखल झाले असून त्यांच्यासोबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि आमदार हर्षवर्धन पाटील देखील हजर आहेत.

  • 26 Apr 2025 03:30 PM (IST)

    पहलगाम हल्ला : दिवंगत कौस्तुभ गनबोटे यांच्या घरी राज्यमंत्री माधुरी मिसाळ दाखल

    पुणे येथील व्यवसायिक कौस्तुभ गनबोटे यांच्या घरी राज्यमंत्री माधुरी मिसाळ दाखल झाले आहेत. तर आमदार हर्षवर्धन पाटील देखील गनबोटे यांच्या घरी दाखल झाले आहेत.

  • 26 Apr 2025 03:22 PM (IST)

    धनगर समाजाला आरक्षण देण्याकरता राम शिंदेच काफी है..

    धनगर समाजाला आरक्षण देण्याकरता राम शिंदेच पुरेसा असून राम शिंदेला सभापती पद मिळू नये यासाठी कोणी कोणी विरोध केला, याची यादीच माझ्याकडे आहे असेही राम शिंदे यांनी म्हटले आहे.

  • 26 Apr 2025 03:09 PM (IST)

    पुण्यात राहात्या घरावर काचेवर गोळीबार

    शालिनी कॉटेज साळुंके विहार रोड येथे राहत्या घराच्या काचेवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.श्रीकांत कानडे नावाच्या व्यक्तीच्या घरावर गोळीबार झाला आहे. कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

  • 26 Apr 2025 03:05 PM (IST)

    भारतातील पाकिस्तानी नागरिकांचा भारताचे नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज

    मुंबईत एकूण 14 पाकिस्तानी नागरिक असल्याची सूत्रांची माहिती आहे. 14 पैकी 9 पाकिस्तानी नागरिकांसाठी एक्सिट परमिट जारी करण्यात आलं आहे. तर, अमरावतीत 118 पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती मिळाली आहे. अमरावतीतील 118 पाकिस्तानी लॉंग टर्मसाठी भारतात आहेत. अनेकांचं 10 ते 15 वर्षांपासून भारतात वास्तव्य, व्यवसायही सुरु आहे. त्यामुळे त्या पाकिस्तानी नागरिकांनी भारतातील नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज केल्याचंही समोर आलं आहे. तसेच भारतीय नागरिकत्वासाठी केलेल्या अर्जाची पडताळणी सुरु असल्याचीही माहिती आहे.

  • 26 Apr 2025 02:41 PM (IST)

    पाकड्यांना जशास तसं उत्तर देण्यासाठी भारत सज्ज: चंद्रशेखर बावनकुळे

    भारताकडून पाकड्यांना जशास तसं उत्तर देण्यात येणार. पाकड्यांच्या धमक्यांना उत्तर देण्यासाठी भारत सज्ज आहे. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडावाच लागणार आहे. असं वक्तव्य भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. तसेच सार्क किंवा अल्पकालीन व्हिसाने राहत असलेल्या पाक नागरिकांना भारत सोडण्याची नोटीस दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

  • 26 Apr 2025 02:18 PM (IST)

    पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांना सैन्याचा दणका; 5 दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त

    पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांना सैन्याचा दणका बसला आहे. काल (25 एप्रिल 2025 ) पासून 5 दहशतवाद्यांची 7 घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत . पुलवामा,कुलगाम , त्राल , बिजबेहरा आणि शोपियान भागात कारवाई करण्यात आली आहे. यात एहसान शेखचं पुलवामामधील घर उद्धवस्थ करण्यात आलं आहे. दहशतवादी झाकीर अहमद गनीच्या घरावर कारवाई करण्यात आली आहे त्यानंतर दहशतवादी शाहीद अहमदचं घरही जमीनदोस्त करण्यात आलं आहे. त्यानंतर आसिफ शेखच्या त्रालमधील घरावरही कारवाई करण्यात आली आहे. तर आदिल ठोकरचं अनंतनागमधील घर थेट

  • 26 Apr 2025 01:41 PM (IST)

    Maharashtra Breaking: चोटीपुरा गावात टीव्ही 9 मराठी दाखल

    चोटीपुरा गावात लष्कराची धडक कारवाई … शाहीद कुटे याचे घर जमीनदोस्त… दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेल्या शाहीदच्या घरावर कारवाई

  • 26 Apr 2025 01:23 PM (IST)

    Maharashtra Breaking: नवी दिल्लीतील हापूस महोत्सव रद्द

    पहलागाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजकांचा निर्णय… खासदार रविंद्र वायकर यांच्याकडून कार्यक्रम रद्द झाल्याची घोषणा… देश शोकसागरात असल्यामुळे महोत्सव रद्द… ३० एप्रिल – १ मे रोजी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते… हापूस महोत्सवाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार होते…

  • 26 Apr 2025 01:09 PM (IST)

    Maharashtra Breaking: कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात…

    दररोज कांद्याच्या बाजारभावात घसरण… कांद्याचे सरासरी बाजार भाव आठशे ते एक हजार रुपयांपर्यंत कोसळले… तर वाढत्या उन्हाळ्यामुळे कांद्याची प्रतवारी होते खराब… कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा साठवणुकीकडे कल…

  • 26 Apr 2025 12:59 PM (IST)

    श्रीनगरमध्ये अडकलेले सोलापूर माढ्याचे पर्यटक सुखरुप परतले

    जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये अडकलेले सोलापूर माढ्याचे 51 पर्यटक विशेष विमानाने महाराष्ट्रात गावाकडे सुखरुप दाखल. ढगफुटी झाली नसती तर आमचा देखील हल्यात बळी गेला असता. हल्ला घडल्यावर काय परिस्थिती झाली होती, याचा थरारक अनुभव tv9 ला सांगितला.

  • 26 Apr 2025 12:41 PM (IST)

    नवी दिल्लीतील हापूस महोत्सव रद्द

    नवी दिल्लीतील हापूस महोत्सव रद्द. पहलागाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजकांचा निर्णय. खासदार रविंद्र वायकर यांच्याकडून कार्यक्रम रद्द झाल्याची घोषणा. देश शोकसागरात असल्यामुळे महोत्सव रद्द. ३० एप्रिल – १ मे रोजी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हापूस महोत्सवाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते.

  • 26 Apr 2025 12:24 PM (IST)

    जे.पी.नड्डा दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज दगडूशेठ गणपतीच दर्शन घेतलं. आशीर्वाद मिळवण्यासाठी गणपती दर्शन घेतले. जम्मू-काश्मीर पहलगाम येथे ज्याप्रकारे दहशतवादी हल्ला झाला, देश संकटातून मजबूतीने पुढे जाईल. दोषी असणाऱ्यांना उत्तर दिलं जाईल. भारतीय संकटातून बाहेर येतील. मोदीजींच्या नेतृत्वात याला उत्तर दिले जाईल. पहलगाम हल्ला झाला सरकारने कठोर कारवाईची पावले उचलली आहेत. त्यासाठी आम्हाला देवाने ताकद द्यावी अशी मागणी केली आहे

  • 26 Apr 2025 12:10 PM (IST)

    अमरावतीतील 118 पाकिस्तानी हिंदू नागरिकांना मोठा दिलासा

    अमरावती शहरातील सद्य स्थितीत असलेले 118 पाकिस्तानी नागरिक हे लॉन्ग टर्म वीजावर पाकिस्तानतून भारतात आलेले आहेत. अमरावतीत त्यांचे दहा ते पंधरा वर्षे पासून वास्तव्य आहे. अनेकांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत. अमरावतीमध्ये असलेले पाकिस्तानी हिंदू हे सर्व सिंध प्रांतातले असल्याची माहिती आहे. त्यांनी भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केले आहेत. त्यांच्या कागदपत्रांची सरकार पातळीवर पडताळणी सुरू आहे.

  • 26 Apr 2025 11:58 AM (IST)

    तरुणाविरोधात गुन्हा दाखल

    ‘पहलगाम’ दहशतवादी हल्ल्याच्या समर्थनाचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी करमाळ्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला करमाळा पोलिसांनी अटक केली आहे. करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी येथील युवकाने पहलगाम घटनेच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने समाजाच्या भावना दुखावणे व चिथावणीखोर कृत्य केल्याच्या आरोपाखाली करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी फिर्याद दिली होती. वादग्रस्त स्टेटस ठेवल्याप्रकरणी शेलगाव वांगी येथील अजहर असिफ शेख याच्याविरोधात करमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे

  • 26 Apr 2025 11:51 AM (IST)

    अजितदादांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

    काँग्रेस कार्यकर्त्यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफी करण्याची आंदोलकांनी मागणी केली.पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

  • 26 Apr 2025 11:27 AM (IST)

    अंबादास दानवे यांची टीका

    उद्धव ठाकरे यांनी काय वक्तव्य केले ते सांगा परंतु यांनाच देश एकत्र व्हायला नको आहे. अशा अतिरेकी कारवयाच्या विरुद्ध शिवसेनेने ज्या भूमिका घेतलेल्या आहे त्या अग्रेसिव आहे. यामध्ये राजकारण आणण्याची गरज नाही, असे शिवसेना नेते अंबादास ठाकरे यांनी ठणकावले.

  • 26 Apr 2025 11:20 AM (IST)

    2034 पर्यंत फडणवीस हेच मुख्यमंत्री

    2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असे बावनकुळे म्हणाले. विकसीत महाराष्ट्र हा फडणवीस यांचा संकल्प आहे. फडणवीस मुख्यमंत्री असल्याशिवाय विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही. फडणवीस यांच्या नेतृत्वातच आपल्याला पुढे जायचे आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिन सरकारच राज्याचा विकास, भले करू शकतात, असे बावनकुळे म्हणाले.

  • 26 Apr 2025 11:10 AM (IST)

    मुंबईत नौकाविहार करणार्‍यांसाठी खूषखबर

    मुंबईच्या वरळी इथला समुद्रात २०० मिटर आत डॉल्फिनचा मुक्त संचार दिसत आहे. पाच ते सहा डॉल्फिन्सचा मुक्त संचार दिसून येत आहे. वरळीतील पिरामल हाऊस समोरील समुद्रात या डॉल्फिन जवळून पाहता येत आहेत.

  • 26 Apr 2025 11:00 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार परभणी दौऱ्यावर

    उपमुख्यमंत्री अजित पवार आज परभणी दौऱ्यावर आहेत. काही वेळात अजित पवार परभणी तालुक्यातील पोखरणी नृसिंह मंदिरात दाखल होणार आहे.

  • 26 Apr 2025 10:57 AM (IST)

    भिवंडीत फर्निचरच्या गोदामाला भीषण आग

    भिवंडी तालुक्यातील राहनाळ गावच्या हद्दीत स्वागत कंपाउंडमधील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीत फर्निचरची 7 ते 8 गोदामे जळून खाक झाली आहे. फर्निचरची पूर्ण इमारत आगीच्या भक्षस्थानी पडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या दाखल झाल्या आहेत.

  • 26 Apr 2025 10:44 AM (IST)

    घोडबंदर मार्गावर 100 तासांचा मेगाब्लॉक

    ठाण्यातील घोडबंदर मार्गावर 100 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सार्वजनिक विभागाकडून मिशन गायमुख घाटच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे जड-अवजड वाहतूक बंद आहे. पर्यायाने घोडबंदरवरून गुजरातकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

  • 26 Apr 2025 10:30 AM (IST)

    ‘पहलगाम’ हल्ल्याच्या समर्थनाचे स्टेटस, एकास अटक

    ‘पहलगाम’ दहशतवादी हल्ल्याच्या समर्थनाचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी करमाळ्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला करमाळा पोलिसांनी अटक केली आहे. अजहर असिफ शेख असे आरोपीचे नाव आहे.

  • 26 Apr 2025 10:19 AM (IST)

    जे पी नड्डा यांनी घेतले दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

    भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी मंदिरात अभिषेक देखील केला. जम्मू-कश्मीरमधील दहशतवाद नष्ट व्हावा, असे साकडे त्यांनी गणरायाला घातले.

  • 26 Apr 2025 10:05 AM (IST)

    पाणी टंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन

    छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाई विरोधात ठाकरे गटाचे दिंडी व भजन आंदोलन झाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली दिंडी आणि भजन आंदोलन करण्यात झाले. यावेळी अंबादास दानवे हे वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये दाखल झाले होते. आंदोलनात ठाकरे गटाचे पदाधिकारी हातात टाळ, गळ्यात विना आणि मृदुंग घेऊन आंदोलन करत होते.

  • 26 Apr 2025 09:35 AM (IST)

    पंढरपूर – पेहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध

    पंढरपूर मुस्लिम समाजाच्या वतीने बडा कब्रस्तान मज्जिद या ठिकाणी पेहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला.

    मुस्लिम समाजाच्या वतीने पाकिस्तान मुर्दाबाद हिंदुस्तान जिंदाबादच्या देण्यात आल्या घोषणा.

  • 26 Apr 2025 09:13 AM (IST)

    अक्कलकोट तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा, उडगीत वीज पडून बैल मृत्युमुखी.

    अक्कलकोट तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून उडगीत वीज पडून बैल मृत्युमुखी पडला आहे.

    गेल्या काही दिवसापासून उकाड्या पासून हैराण असलेल्या अक्कलकोटकरांना अवकाळी पावसामुळे दिलासा मिळाला. अक्कलकोट तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने लावली हजेरी. मात्र अवकाळी पावसामुळे तालुक्यातील आंबा, द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

  • 26 Apr 2025 09:07 AM (IST)

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघरमध्ये

    पालघर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर मध्ये. महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी राज्य अधिवेशनाला लावणार हजेरी. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुपारी साडे बारा वाजता अधिवेशनाचं उद्घाटन .

  • 26 Apr 2025 08:49 AM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. ग्राम विकास विभाग आणि राज्य पंचायत राज विभाग राज्यस्तरीय कार्यशाळेला राहणार उपस्थित . देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करतील.

  • 26 Apr 2025 08:47 AM (IST)

    जम्मू-काश्मीरच्या कुलगाममधून संशयितांना अटक

    जम्मू-काश्मीरच्या कुलगाममधून संशयितांना अटक करण्यात आली आहे. बंदुका आणि काडतुसांसह त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हे दोघे दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा संशय आहे.

Published On - Apr 26,2025 8:47 AM

Follow us
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण...
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण....
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्.
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार.
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय.
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?.
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात.
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य.