VIDEO | तेलंगणाचे मुख्यमंत्री ‘केसीआर’ आणि उद्धव ठाकरे यांच्यात चाय पे चर्चा; तिसऱ्या आघाडीचा शड्डू!

तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध अतिशय मधुर होते. मात्र, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राव सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. त्यांनी अनेकदा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यावरही शरसंधान साधले आहे. राफेल घोटाळाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जायचा इशाराही दिला आहे.

VIDEO | तेलंगणाचे मुख्यमंत्री ‘केसीआर’ आणि उद्धव ठाकरे यांच्यात चाय पे चर्चा; तिसऱ्या आघाडीचा शड्डू!
के. चंद्रशेखर राव यांनी आज मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी तेजस ठाकरे उपस्थित होते.
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 1:22 PM

मुंबईः तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (KCR) अर्थातच के. चंद्रशेखर राव यांनी आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुंबईत घेतली. विशेष म्हणजे यावेळी तेजस ठाकरे यांची उपस्थिती होती. सध्या ‘केसीआर’ तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जातेय. केंद्रातल्या भाजप (BJP) सरकारविरोधात वेगवेगळ्या राजकीय पक्षांची मोट बांधण्याचे संकेत नुकतेच ‘केसीआर’ यांनी दिले होते. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्याचा मनोदयही व्यक्त केला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर ‘केसीआर’ यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतलीय. या भेटीत काय चर्चा झाली, हे अजून समजू शकले नाही. मात्र, या आज दुपारी चार वाजता केसीआर आणि राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातही एक महत्त्वाची बैठक होणार असल्याचे समजते. या बैठकीकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न

तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध अतिशय मधुर होते. मात्र, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राव सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. यापूर्वी त्यांनी अनेकदा थेट मोदींवरही शरसंधान साधले आहे. राव यांचा 17 फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता. हे निमित्त साधून मोदी यांनी ट्वीट करून त्यांना शुभेच्छाही दिल्या. मात्र, राव काही केल्या मवाळ झाले नाहीत. त्यांनी केंद्रातल्या भाजपविरोधात तिसरी आघाडी उभी करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्यात.

ममतांचीही भेट घेणार

राव यांनी यापूर्वीच 20 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. शिवाय त्यांची भेट घेण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हैदराबादला येणार असल्याचेही संकेत दिले होते. राव म्हणाले की, ममता बॅनर्जी यांनी मला फोन केला. त्यांनी मला बंगालमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. अथवा आपण हैदराबादला येऊ असे सांगितले. त्यांनी मला डोसा खावू घाला, अशी विनंती केली. मी त्यांचे कधीही स्वागत असल्याचे सांगितले. त्यामुळे ममताही लवकरच हैदराबादला भेट देऊ शकतात.

सध्याची परिस्थिती घातक

राव यांनी गेल्या काही दिवसांपासून केंद्रातल्या भाजप सरकारवर जोरदार टीका केलीय. भाजपच्या जनतेविरोधी धोरणांविरोधात इतर पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहनही केले आहे. राव यांनी राफेल लढावू विमानाच्या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाय. यातले खरे-खोटे जनतेसमोर आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावू असा इशाराही पूर्वीच दिलाय. राव म्हणालेत की, 2019 च्या निवडणुकीपूर्वी अनेक विरोधी नेते आणि मुख्यमंत्र्यांना भेटलोय. मात्र, भाजप पुन्हा सत्तेत आल्याने अनेक गोष्टी बदलल्यात. सध्याची परिस्थिती देशासाठी घातक सिद्ध होतेय. ती दिवसेंदिवस चिघळतेय. त्यामुळे तिसरी आघाडी उभारू. त्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल. मात्र, या आघाडीचे नेतृत्व कोण करेल, यावर त्यांनी ठोस उत्तर दिले नाही. या पार्श्वभूमीवर आज होणारी राव आणि उद्धव भेट महत्त्वाची मानली जातेय. हे राजकारणाचे वेगळे वळण असू शकते का, याचे उत्तर येणारा काळच देईल.

इतर बातम्याः

पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला

‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात

शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.