Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketaki Chitale : केतकी चितळेच्या स्मित हस्यामागचे रहस्य काय? अटक, अंडाफेक, ते कोठडी, हास्य मात्र कायम

नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यातून ठाण्यात घेऊन जाताना केतकी चितळेला बाहेर काढण्यात आलं. यावेळी केतकी चितळेवर अंडी फेकण्या आली. शाई फेकण्यात आली. तिच्यावर हल्लाही झाला. मात्र तरीही केतकी चितळे ही स्माईल करताना दिसून आली.

Ketaki Chitale : केतकी चितळेच्या स्मित हस्यामागचे रहस्य काय? अटक, अंडाफेक, ते कोठडी, हास्य मात्र कायम
केतकी चितळे Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 5:06 PM

ठाणे : अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale) आजच ठाणे कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. केतकी चितळेविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिला ताब्यात घेण्यासाठी आता गोरेगाव पोलीस आणि पुणे पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. सुरूवातील केतकी चितळेला नवी मुंबईतील कळंबोली पोलिसांनी (Navi Mumbai Police) ताब्यात घेतलं. त्यानंतर तो गुन्हा हा गुन्हे शाखेकडे वर्ग करून तिला ठाणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यातून ठाण्यात घेऊन जाताना केतकी चितळेला बाहेर काढण्यात आलं. यावेळी केतकी चितळेवर अंडी फेकण्या आली. शाई फेकण्यात आली. तिच्यावर हल्लाही झाला. मात्र तरीही केतकी चितळे ही स्माईल करताना दिसून आली. पोलिसांनी मोठ्या गडबडीने तिला उचलून गाडीत घेडतलं. मात्र गाडीतही केतकी हसतानाच दिसून आली.

पडल्यानंतरही केतकीची स्माईल गेली नाही

केतकीच्या स्माईलमातील रहस्य काय?

कोर्टात आतापर्यंत केतकीला दोनवेळा हजर करण्यात आलं. त्यात पहिल्या वेळी तर केतकीने तिची बाजू खुद्द मांडली आणि तिची बाजू वकिलांनी मांडली. मात्र दोन्ही वेळी केतकी हसतानाच दिसून आली. पोलीस कोठडी आणि जेल या अशा गोष्टी आहेत जिथे भल्या भल्यांचं हस्य गायब होतं. त्यामुळे अनेकजण कोर्टाची आणि जेलची पायरी चढायाला लागू नये हीच प्रार्थना करतात. पोलिसांच्या खाक्यालाही अनेकजण दबकून असतात. मात्र पोलिसांच्या ताब्यात असताना अडीफेक आणि शाईफेक, त्यातच हल्ला झाला असताना एवढ्या धक्काबुक्कीतही केतकी हसताना दिसून येत आहे. त्यामुळे केतकीच्या या स्मित हस्यामागचे रहस्य काय असा सवाल सहाजिकच उपस्थित होत आहे.

हे सुद्धा वाचा

अडचणी आणखी वाढणार?

आता पोलीसांच्या ताब्यात असताना जरी केतकी चितळे हसताना दिसत असली तरी तिचं हे हास्य आणखी किती टिकेल याबाबत शंका आहे. कारण केतकीविरोधात फक्त ठाण्यातच नाही तर अनेक ठिकाणी केसेस दाखल झाल्या आहेत. त्यात गोरेगाव, नाशिक, पुणे, धुळे, उस्मानाबाद, अशा विविध ठिकाणांचा समावेश आहे. त्यामुळे आता ठाणे कोर्टाने जरी केतकीला न्यायालयीन कोठडी देत तिच्या जामीनासाठी अर्ज करण्याचा मोकळा केला असला तरी इतर ठिकाणचे पोलीस तिला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नात आहेत. त्यामुळे त्यांना केतकीचा ताबा मिळाल्यास पुन्हा तिच्या अडचणी वाढू शकतात. पुन्हा तिचा पोलीस कोठडीतला मुक्काम वाढू शकतो. त्यामुळे केतकीची ही स्माईल किती टिकेल याबाबत जरा शंकाच आहे. आता हे प्रकरण कुठपर्यंत जातं? हे येणारे काही दिवस सांगतीलच.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.