‘सुरत स्वारी’चा चमत्कार घडवणारे सी. आर. पाटील आहेत तरी कोण? खानदेशातील पाटलांची गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी कशी लागली वर्णी?

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूंकप झाल्यानंतर आणि शिवसेनेतील आणखी एका बंडानंतर या बंडाचे केंद्रस्थान असलेल्या गुजरातमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं नावं चर्चेत आलं आहे. त्यांचं मुळ गाव कोणतं तर ते या पदापर्यंत कसे पोहचले याविषयीचा हा आढावा

'सुरत स्वारी'चा चमत्कार घडवणारे   सी. आर. पाटील आहेत तरी कोण? खानदेशातील पाटलांची गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी कशी लागली वर्णी?
कोण आहेत सी. आर. पाटीलImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 11:35 AM

Surat Swari: शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडाने महाराष्ट्राच्या राजकारणात भूंकप आला आहे. तर शिवसेनाला (Shivsena) छगन भूजबळ, नारायण राणे, राज ठाकरे यांच्यानंतरचा हा सर्वात मोठा हादरा आहे. या भूकंपाचे केंद्र बिंदू अर्थातच गुजरात आहे. त्याला रसद महाराष्ट्रातून पुरवण्यात आली हे ही उघड आहे. विधान परिषदेच्या (Legislative Council) निकाला लागोलाग शिंदे यांचे नाराजीनाट्य सुरु झाले. त्यांनी बंडाची तलवार का उपसली, त्यांची नाराजी कोणावर आहे, त्याचा रोख कोणावर आहे, हे अवघ्या काही तासात समोर येईलच. दरम्यान या सुरत स्वारी चा चमत्कार घडवणारे सी. आर. पाटील (C. R. Patil) यांचं नावं पुढे आले आहे. चर्चेत असलेले सी. आर. पाटील नेमके आहेत तरी कोण? त्यांचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे. ते नेमक्या कोणत्या भागातील आहेत. त्यांचे मुळ गाव कोणते? असे प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पाटील यांची थेट भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी (Appointment on Gujarat BJP State President) कशी आणि का वर्णी करण्यात आली. त्यामागची कारणं काय आहेत, हे जाणून घेऊयात..

चंद्रकांत पाटील हे मुळचे खानदेशमधील

खासदार पाटील हे मूळचे खानदेश, जळगाव जिल्ह्यातील आहेत. जवळपास गेल्या तीस वर्षांपासून ते नवसारीमध्ये कार्यरत आहेत.पाटील 2009 पासून भाजपच्या तिकीटावर सुरत-नवसारी लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या वाराणसी मतदारसंघाच्या विकासाचा कार्यभार सी. आर. पाटील यांच्यावर सोपवण्यात आला होता. पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात.खासदार सी. आर. मुक्ताईनगर तालुक्यामधील पिंप्री अकारुत हे पाटील यांचे मुळ गाव आहे. त्यांचा जन्म पिंप्री अकारुत येथेच झाला. त्यांचे शिक्षण आयटीआयपर्यंत झाले आहे.सुरतमध्ये 1989 मध्ये पोलिस कॉन्स्टेबलपदी ते भरती झाले होते. त्यानंतर सुरतमध्ये सामाजिक कार्य करत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. जीआयडीसीच्या अध्यक्षपदापासून भाजपची संघटनेतील अनेक महत्वाची पदे त्यांनी सांभाळली आहेत.

हे सुद्धा वाचा

दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा मराठी माणसाची वर्णी

चंद्रकांत पाटील यांच्या रुपाने पहिल्यांदा गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदीमराठी माणसाची वर्णी लागली. दोन वर्षांपूर्वी 20 जुलै 2020 रोजी पाटील यांच्या गळ्यात गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली. तंत्रज्ञानाचा कामात खुबीने वापर करण्यात पाटील यांची हतोटी आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन लोकांची अनेक कामे चुटकीसरशी मार्गी लावण्यात त्यांचा हातखंड आहे. तंत्रज्ञानाच्या सहायाने ते जनतेशी कायम संपर्कात असतात. सरकारी योजना तातडीने लोकांपर्यंत पोहचविणे आणि सुविधांचा उत्तम उपयोग केल्याप्रकरणी सर्व खासदारात ते अग्रेसर होते. या कार्याची दखल घेत त्यांच्या कार्यालयाला 2015 मध्ये आयएसओ:2009 (ISO:2009) हे प्रमाणपत्र ही मिळाले आहे. असं प्रमाणपत्र मिळविणारे पाटील हे पहिले खासदार ठरले आहेत. त्यांच्या या गुणामुळेच त्यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्याची चर्चा आहे. हे विशेष योगायोग म्हणजे त्याचवेळी महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदीही चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. हा योगायोग आता किती फायद्याचा ठरला हे वेगळं सांगायला नको.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.