राज्यात कोविड काळात मोठा ऑक्सिजन घोटाळा?, किरीट सोमय्यांचा आरोप, लवकरच काळी पत्रिका आणणार
रिव्हेरा कोविड रुग्णालयाप्रमाणेच राज्यातील अनेक ठिकाणच्या कोविड रुग्णालयांची असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.
ठाणे : राज्यात कोविड काळात कोट्यवधी रुपयांचा ऑक्सिजन घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. या ऑक्सिजन घोटाळ्याबाबत लवकरच काळी पत्रिका प्रसिद्ध करुन, राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिलाय. किरीट सोमय्या हे आज पालघर जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी विक्रमगड इथल्या रिव्हेरा कोविड रुग्णालयाला भेट देत सेंट्रलाईज ऑक्सिजन सिस्टिमची पाहणी केली.(Kirit Somaiya alleges that there was a big oxygen scam in Corona period)
विक्रमगड इथे रिव्हेरा कोविड रुग्णालयातील सेंट्रलाईज ऑक्सिजन यंत्रणा अद्याप कार्यान्वित होऊ शकलेली नाही. त्यासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. रिव्हेरा कोविड रुग्णालयाप्रमाणेच राज्यातील अनेक ठिकाणच्या कोविड रुग्णालयांची असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. हे ठाकरे सरकारचं अपयश आहे. कोविड काळात राज्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. अशावेळी सेंट्रलाईज ऑक्सिजन यंत्रणा योग्यवेळी कार्यान्वित न झाल्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण गेले. तर असंख्य रुग्णांचे अवयव निकामी झाले. याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा घणाघात सोमय्या यांनी यावेळी केलाय.
कोल्हापूर झेडपीत कोरोना साहित्य खरेदी घोटाळा?
कोरोना काळात कोल्हापूर जिल्हा परिषदने केलेल्या साहित्य खरेदीत 35 कोटींचा घोटाळ्याचा आरोप भाजपने केला होता. मास्क, सॅनिटायझर तसेच अन्य आवश्यक साहित्य चढ्या दराने खरेदी करुन यंत्रणेतील लोकांनी मोठा डल्ला मारल्याचं भाजप सदस्यांचे म्हणणं होतं. पण सत्ताधारी महाविकास आघाडीने मात्र विरोधकांच्या या सर्व आरोपाचे खंडन केलं होतं.
साहित्य खरेदी करणाऱ्या यंत्रणेतील लोकांनी काही ठराविक लोकांना हाताशी धरुन हा घोटाळा केल्याचं भाजप सदस्यांच म्हणणं होतं. विरोधकांचा हाच आरोप महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्यावेळी कळीचा मुद्दा बनला होता. कोरोना काळात मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, पल्स ऑक्सिमिटर, व्हेंटिलेटर असंच सगळं साहित्य चढ्या दराने खरेदी केल्याचा आरोप करत याची कॅग मार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपचे सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केली होती
राज्यात पुन्हा कडक निर्बंध?
कोरोना पार्श्वभूमीवर कुणीही मास्क घालत नाही हे अत्यंत घातक आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना दिलाय. औरंगाबादेत अजित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतलीय, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनावर कोणीही राजकारण करू नये, असंही अजित पवार म्हणालेत. रुग्ण वाढत असल्यानं कोरोनासंदर्भात कडक निर्बंध पुन्हा एकदा लागू करण्यात येण्याचे संकेत अजित पवार यांनी दिलेत.
…तर भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल : उद्धव ठाकरे#uddhavthackeray #shivsena #bjp #sanjayrathod #RamMandirNidhiSamarpan https://t.co/O5OPnZx0n3
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 16, 2021
संबंधित बातम्या :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोठा निर्णय घेणार; अजित पवारांचे संकेत
अमरावतीत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच, गुरुदेवनगरमधील बाजारपेठ बंदचे आदेश
Kirit Somaiya alleges that there was a big oxygen scam in Corona period