Kirit Somaiya: अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नॉट रिचेबल सोमय्यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; म्हणाले…

Kirit Somaiya: आयएनएस विक्रांत (ins vikrant) घोटाळ्याप्रकरणी जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) पहिल्यांदाच मीडियासमोर आले आहेत. सोमय्यांनी या घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार असून तिथे आपली बाजू मांडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Kirit Somaiya: अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नॉट रिचेबल सोमय्यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; म्हणाले...
अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नॉट रिचेबल सोमय्यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; म्हणाले... Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 10:48 AM

मुंबई: आयएनएस विक्रांत (ins vikrant) घोटाळ्याप्रकरणी जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) पहिल्यांदाच मीडियासमोर आले आहेत. सोमय्यांनी या घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार असून तिथे आपली बाजू मांडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तक्रारदाराने शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्या विधानवरून तक्रार केली आहे. या घोटाळ्याचा दावा केला जात आहे. पण एक कागदही तक्रारदार आणि कुणीच दिला नाही. नुसते हवेतील आरोप केले आहेत. या संपूर्ण गोष्टी कोर्टासमोर मांडणार असल्याचं सांगतानाच ठाकरे सरकारमधील घोटाळेबाजांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. तर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमय्यांवर राजकीय सूडबुद्धीतून कारवाई करण्यात येत नाही. त्यांनी जर काही केले नाही तर समोर यावं. पैशाचा हिशोब द्यावा, असं म्हटलं आहे. त्यामुळे सोमय्या उच्च न्यायालयात कधी अर्ज करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काल कोर्टाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर सोमय्या नॉट रिचेबल झाले होते. त्यांच्या पत्नीच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यालाही ते उपस्थित राहिले नव्हते. त्यांचा फोनही लागत नव्हता. त्यातच या प्रकरणावर एकाही भाजप नेत्याने प्रतिक्रिया न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. त्यानंतर आज सोमय्या यांनी एका व्हिडीओद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने विक्रांत 60 कोटीला भंगारवाल्यांना विकण्याचा निर्णय घेतला होता. भाजपने त्याचा निषेध नोंदवला होता. 10 डिसेंबर 2013 रोजी आम्ही फक्त एक प्रतिकात्मक निधी जमवण्याचा कार्यक्रम घेतला. केवळ 11 हजार रुपये जमवले होते. आज दहा वर्षानंतर राऊत म्हणतात, सोमय्यांनी 58 कोटी रुपये जमा केले. चार बिल्डरशी मनी लॉन्ड्रिंग करून आपल्या मुलाच्या कंपनीत वळवले. या पूर्वी राऊतांनी दोन महिन्यात सात आरोप केले. एकाचाही पुरावा दिला नाही. पोलिसांकडे एकही कागद नाही. केवळ राऊतांच्या स्टेटमेंटवरून तक्रार केल्याचं तक्रारदार म्हणतोय, असं सोमय्या म्हणाले.

सर्व माहिती उच्च न्यायालयात देऊ

विक्रांत वाचवण्यासाठी आम्ही राष्ट्रपतींना भेटलो होतो. राज्यपालांना भेटलो. गोपीनाथ मुंडेही राष्ट्रपतींकडे होतो. तेव्हाही आम्ही ही गोष्टी सांगितल्या होत्या. पण ठाकरे सरकारच्या घोटाळ्याबाजांना अद्दल घडवल्याशिवाय सोमय्या शांत बसणार नाही. विक्रांतबाबतची सर्व माहिती उच्च न्यायालयात देऊ, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Sanjay Raut : सोमय्या 140 कोटी जमा करून राजभवनात देणार होते, 58 कोटीच जमवता आले, संजय राऊतांचा सोमय्यांना चिमटा

Anil Deshmukh : अनिल देशमुखांना 16 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी, कस्टडी न देण्याची मागणी

Mumbai : मुंबईला मिळाली एक नवी ओळख! जागतिक स्तरावर ‘वृक्ष नगरी’ म्हणून मुंबईची निवड

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.