Kirit Somaiya : माझ्यावरील हल्ल्याला पोलीस आयुक्त संजय पांडेच जबाबदार; किरीट सोमय्या यांचा थेट आरोप
किरीट सोमय्या म्हणाले, एवढे गुंड कसे काय जमू शकतात. सतत मुख्यमंत्री कार्यालयातून पोलिसांना फोन जात होते. खरे तर मी चार इंचावर होतो. दगड लागला असता, तर माझा डोळा गेला असता.
मुंबईः माझ्यावरील हल्ल्ल्याला पोलीस आयुक्त संजय पांडेच जबाबदार आहेत, असा थेट आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केला. मी पोलिसांना (Police) सांगितले होते की, आपल्यावर हल्ला होणार आहे. मात्र, ते म्हणाले आम्ही जबाबदारी घेतली आहे, पण गेट उघडताच गुंडांनी हल्ला केला. पोलिसांनी त्यांना सहकार्य केलं. हे पाप पोलिसांचं आहे. याला पोलीस आयुक्त संजय पांडेच जबाबदार आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला. राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या हे खार पोलीस (Khar Police station) स्थानकात गेले होते. त्यावेळी तुफान राडा झाला. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिकांच्या रोषाला किरीट सोमय्या यांना जावं लागलं. त्यानंतर झालेल्या दगडफेकीत किरीट सोमय्या यांच्या गाडीची काच फुटली. किरीट सोमय्या यांनाही जखमा झाले. त्याच्या हनुवटीतून रक्त वाहत होतं. तर त्यांच्या शेजारी बसलेल्याला माणसाच्या हातातही तुटलेल्या खिडकीच्या काचा घुसल्या. या हल्ल्यानंतर आता किरीट सोमय्यांनी शिवसैनिकांवर गंभीर आरोप केलेत. मला जीवे मारण्याचा हा तिसरा प्रयत्न असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे.
हल्ल्यामागे ठाकरे सरकार…
किरीट सोमय्या म्हणाले की, काल खार पोलीस स्टेशन येथे माझ्यावर हल्ला झाला. तो ठाकरे सरकारने स्पॉन्सर केलेला हल्ला होता. मी संध्याकाळी पोलीस स्टेशनला कळवलं होतं. साडेनऊ वाजले होते. मी पोहोचण्याआधी सत्तर ऐंशी शिवसैनिक जमले होते. येताना मला शिवीगाळ केली. गाडी थांबवली. परत जाताना पोलिसांना सांगितलं, हल्ला करणार आहेत. पोलीस म्हणाले आम्ही जबाबदारी घेतली आहे, पण गेट उघडताच गुंडांनी हल्ला केला. पोलिसांनी त्यांना सहकार्य केलं. हे पाप पोलिसांचं आहे. याला पोलीस आयुक्त संजय पांडेच जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला.
फेक एफआयआर केला…
किरीट सोमय्या म्हणाले, एवढे गुंड कसे काय जमू शकतात. सतत मुख्यमंत्री कार्यालयातून पोलिसांना फोन जात होते. हा एफआयआर आहे. त्यात यात लिहिलंय. शिवसैनिक १०० मीटर आणि तीन किलोमीटर दूर आहेत. हे पांडेंनी डिक्टेट केलं. माझ्या गाडीवर लांबून दगड आला हे माझ्या नावाने पांडेंनी लिहिलं. मॅनिप्यलेटेड एफआयआर आहे. मी सही करणार नाही असं सांगितलं. हा फेक एफआयआर आहे. पण त्यांनी हा एफआयआर ऑनलाइन पाठवला. खरे तर मी चार इंचावर होतो. दगड लागला असता, तर माझा डोळा गेला असता.
इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!