आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांना समजावणार का?; किरीट सोमय्या यांचा सवाल
माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात गर्दी झाली होती. (kirit somaiya taunt cm uddhav thackeray over coronavirus outbreak)
मुंबई: माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात गर्दी झाली होती. गर्दी होऊ नये याचं भान महाडिक यांनी राखलं पाहिजे होतं. या लग्नाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांना समजावणार का? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. (kirit somaiya taunt cm uddhav thackeray over coronavirus outbreak)
किरीट सोमय्या यांनी रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेची आज भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी हा सवाल केला. मुख्यमंत्र्यांनी मी जबाबदार अशी मोहीम सुरू केलीय. त्याची घोषणाही त्यांनी केली. ते कोविड योद्धांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारावर टीका करत असतील तर मी गैरजबाबदार असा पुरस्कार शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला पाहिजे, अशी टीका त्यांनी केली.
आव्हाडांच्या फोन टॅपिंगची चौकशी करा
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे फोन आणि व्हॉट्सअॅप टॅपिंग होत आहेत. हे त्यांनीच ट्विट करून सांगितलं आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून या प्रकरणाचा छडा लावावा, अशी माझी मागणी आहे, असंही ते म्हणाले.
पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कमी करा
महाराष्ट्र सरकार पेट्रोलवर 27 रुपये घेत आहे. ठाकरे सरकारने हा टॅक्स कमी करावा. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरचे टॅक्स कमी करून नागरिकांना आनंदाची बातमी द्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं.
मोनिकाच्या हाताच्या हालचाली सुरू
2014 रोजी घाटकोपरमध्ये रेल्वे अपघातात मोनिका मोरेने दोन्ही हात गमावले होते. आज सहा वर्षानंतर तिच्या हातांची पुन्हा चालचाल सुरू झाली आहे. हातांची 30 टक्के हालचाल सुरू होत असल्याचं मोनिकाने सांगितलं आहे. हातांची हालचाल सुरू व्हायला अजून सहा महिने लागणार आहेत. मात्र, तिच्या हातांची हालचाल सुरू झाली ही आनंदाची बाब आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं. (kirit somaiya taunt cm uddhav thackeray over coronavirus outbreak)
VIDEO : Special Report | राज्यात लॉकडाऊनची बेडी, महाराष्ट्राला धडकी !https://t.co/xldCVUuGK6#Lockdown #MaharashtraLockdown #Corona #LockdownUpdate
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 21, 2021
संबंधित बातम्या:
राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे लग्नबंधनात, विवाह सोहळ्याला शरद पवार, भुजबळांची उपस्थिती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय, दोन आठवड्यांसाठी जनता दरबार स्थगित
(kirit somaiya taunt cm uddhav thackeray over coronavirus outbreak)