Kishori Pednekar on Raj Thackeray: राज ठाकरेंच्या तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडूळ निघाले; किशोरी पेडणेकरांची घणाघाती टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कात केलेल्या भाषणावर काळजीवाहू महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. राज ठाकरे यांचं कालचं भाषण भाजपने लिहून दिलेल्या स्क्रिप्ट सारखं होतं.
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल शिवाजी पार्कात केलेल्या भाषणावर काळजीवाहू महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. राज ठाकरे यांचं कालचं भाषण भाजपने (bjp) लिहून दिलेल्या स्क्रिप्ट सारखं होतं. त्यामुळे लोक आम्हाला लाव रे तो व्हिडीओ गेला कुठे? असं फेसबुक, ट्विटरवर विचारत आहेत. बऱ्याच मनसैनिकांनी आमच्याशी रात्री चर्चाही केली. आम्हाला वाटलं दोन वर्षाची मोरी तुंबलीय. त्या मोरीतून काही तरी निघेल असं वाटलं होतं. पण त्यातून काही निघालं नाही. तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडूळ निघाले, असा जोरदार हल्ला किशोरी पेडणेकर यांनी केला. काल ते म्हणाले, मला कडेवर घ्या ना, मला कडेवर घ्या ना… खरं तर ते आमच्यासाठी नव्हतं. हा त्यांचाच त्यांच्यासाठी प्रयत्न होता, असा टोलाही किशोरी पेडणेकर यांनी लगावला.
काळजीवाहू महापौर किशोरी पेडणेकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. काल राज ठाकरे यांची सभा झाली. त्या सभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर प्रामुख्याने टीका करण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत अनेक नेते घडले. त्याच मुशीतून हे देखील घडले. पण हे असे कसे बिघडले? याची उद्विग्नता मला कालपासून सतावत होती. त्यामुळे मी आज सकाळी हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला नतमस्तक होण्यासाठी आली आहे, अशी बोचरी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेच शिवसेनाप्रमुखांचे खरे उत्तराधिकारी
कालची बी टीम होती. ज्या पद्धतीने आप बी टीम आहे तशीच. भाजप मांडीवरही घेत नाही अन् खांद्यावर घेत नाहीत. काल ते म्हणत होते मला घ्या ना मला घ्या ना… तो आमचा नाही, तो तुमचा प्रयत्न आहे. मला घ्या ना.. मला घ्या ना. अशा पद्धतीने महाराष्ट्रात शिवसेनेचा द्वेष करून कोणीही मोठा झाला नाही. मुंबईकर पूर्ण ओळखून आहेत. दोन वर्षापासून उद्धवजींच काम सर्व पाहत आहे. यांच्या तर बोलण्याच्या मोऱ्या तुंबल्या. आम्ही तर कामातून विकासाचा धडाका लावला. कोव्हिड कमी होताच लोकार्पण काम सुरू केलं. त्यामुळे उद्वेग आहे. आता काय होणार हे लोकांच्या मनात होते. ते दिसायला लागले. बाळासाहेबांचे पक्के उत्तराधिकारी उद्धव ठाकरेच आहेत. हे सिद्ध झालं. होतंच. पण लोकांच्या मनात कुठे तरी किंतू परंतु होतं. पण कालच्या राजकारणामुळे लोकांना कळलं. बाळासाहेबांचे सुपूत्रं आणि नातू हेच त्यांचे उत्तराधिकारी आहे. बाकी ड्युपलिकेट लोकांचे काम नाही, असा टोला त्यांनी लगावला.
घरच्यांचाही इतका द्वेष?
महागाईचा भडिमार होत आहे. 100 दिवसात मिळणारे 15 लाख कुठे आहे असं लोक विचारतात. या सर्व गोष्टीचा खूप उद्वेग झाला. काल रात्री बाळासाहेबांच्या समाधीवर डोकं टेकवायला आले. तुम्ही अनेकांना घडवलं. त्यात हेही घडले. पण हे असे कसे बिघडले हा मोठा प्रश्न पडला. ज्या पद्धतीने घरच्यांचा पण द्वेष इतका… एखाद्या महिला असतात… तुझं माझं पटत नाही… इतकं … आम्हाला नाही पटलं, कुणालाच नाही पटलं हे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
संबंधित बातम्या: