Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घर नको पण अटी आवर; साधा पंखा असला तरी मिळणार नाही ‘पंतप्रधान आवास’चा लाभ

2022 पर्यंत सर्वांना आपल्या हक्काचं घर मिळून देण्याची महत्त्वकांक्षी योजना केंद्राकडून तयार करण्यात आली आहे. या योजनेला पंतप्रधान आवास योजना असे नाव देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत ज्यांना राहण्यासाठी घर नाही, अशा व्यक्तींना घर बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते. मात्र या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी केंद्राकडून अनेक अटी घालण्यात आल्या आहेत.

घर नको पण अटी आवर; साधा पंखा असला तरी मिळणार नाही 'पंतप्रधान आवास'चा लाभ
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 1:34 PM

मुंबई : 2022 पर्यंत सर्वांना आपल्या हक्काचं घर मिळून देण्याची महत्त्वकांक्षी योजना केंद्राकडून तयार करण्यात आली आहे. या योजनेला पंतप्रधान आवास योजना असे नाव देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत ज्यांना राहण्यासाठी घर नाही, अशा व्यक्तींना घर बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते. मात्र या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी केंद्राकडून अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. कळस  म्हणजे तुमच्या घरी साधा पंखा जरी असला तरी देखील तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध प्रकारच्या तेवीस अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे घर नको पण अटी आवर अशी म्हणण्याची वेळ लाभार्थ्यांवर आली आहे.

लाभार्थ्यांना अटीचा फटका

डाहाणूमधील हाजारो लाभार्थ्यांना या योजनेतील अटींचा फटका बसला आहे.  डाहाणूमधील विविध ग्रामपंचायतींच्या वतीने आपल्या गावातील लाभार्थ्यांची यादी तयार करून ती जिल्हा परिषदेमार्फत मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती. मात्र योजनेसाठी असलेल्या अटींची चाळणी लावत यातील अनेक लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. तसेच ही यादी पुन्हा एकदा फेर सर्वेक्षणासाठी जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहाण्याची शक्यता आहे.

काय आहेत अटी?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तब्बल 23 प्रकारच्या अटी घालण्यात आल्या आहेत. त्यातील प्रमुख अटी म्हणजे, अर्जदाराला स्वता:च्या मालकीचे पक्के घर नसावे, मातीच्या घरात फ्रिज, कुलर, फॅन अशा वस्तू  जरी असल्या तरी देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्याच्या नावावर दुचाकी, किंवा चारचाकी आहे, अशा व्यक्तींना देखील अपात्र ठरवण्यात आले आहे. तसेच तुमच्या घरी जर कृषीशी संबंधित काही अवजारे असतील किंवा सिंचनाची सोय असेल तरी देखील तुमचा अर्ज लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात येईल.

संबंधित बातम्या

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे भाव

आता नोकरी सोडतानाही बसणार आर्थिक फटका; … तर तुमच्या वेतनावर लागणार जीएसटी

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ; जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर

भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो.
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना.
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी.
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.