VIDEO : सदावर्तेंना मराठा आरक्षण अल्ट्रा व्हायर्स म्हणायचं होतं की व्हायरस? बघा त्यांची संपूर्ण मुलाखत

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणावर बोलताना अल्ट्रा व्हायरस असा उल्लेख केला आणि यानंतर एकच गदारोळ झालाय. म्हणूनच गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणावर बोलताना नेमकं काय म्हणाले होते याचा हा खास आढावा.

VIDEO : सदावर्तेंना मराठा आरक्षण अल्ट्रा व्हायर्स म्हणायचं होतं की व्हायरस? बघा त्यांची संपूर्ण मुलाखत
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 7:21 PM

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणावर मोठा निर्णय सुनावत आरक्षण रद्दबातल केलं. यानंतर मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना आपली सखोल भूमिका मांडली. हे बोलत असतानाच सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठातील सर्व न्यायमूर्तींनी मराठा आरक्षण अल्ट्रा व्हायर्स असल्याचं सांगितलं. मात्र, बोलताना त्यांनी याचा उल्लेख अल्ट्रा व्हायरस असा केला आणि यानंतर एकच गदारोळ झालाय. म्हणूनच गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणावर बोलताना नेमकं काय म्हणाले होते याचा हा खास आढावा (Know all about what Adv Gunratna Sadavarte say Ultra Vires or Ultra Virus on Maratha reservation).

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायमूर्तींचा एक दृष्टीकोनाबाबत एकमत आहे ते म्हणजे मराठा आरक्षण हे अल्ट्रा व्हायरस आहे. मराठा आरक्षण दिलं जाऊ शकत नाही. तसेच न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने सांगितलेली परिस्थिती असामान्य असू शकत नाही. सर्वांनी कोणत्याही प्रकारे आरक्षणात 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाऊ शकत नाही, असं म्हटलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण देतानाच 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देणं रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन (उलटा भेदभाव) असल्याचं म्हटलंय.”

“कोरोनाचा व्हायरस आहे तसाच व्हायरस मराठा आरक्षणाचाही निघाला”

“भारतीय संविधानाच्या कायद्यानुसार आरक्षण आज अल्ट्रा व्हायरस ठरलंय. जसा कोरोनाचा व्हायरस आहे तसाच व्हायरस मराठा आरक्षणाचा देखील निघाला. व्हॅक्सिन आणि डॉट देऊन सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या व्हायरसला नेस्तानाबूत केलं,” असंही गुणरत्न सदावर्ते यांनी नमूद केलं.

अल्ट्रा व्हायर्स (Ultra vires) आणि अल्ट्रा व्हायरस (Ultra Virus) यांचा अर्थ काय?

अल्ट्रा व्हायर्स (Ultra Vires) हा लॅटीन कायदेशीर शब्द आहे. त्याचा कायदेशीर भाषेत अर्थ कोणत्याही कायदेशीर संस्थेची आवश्यकता असताना त्याशिवाय केलेली बेकायदेशीर कृती असा आहे. म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत निर्णय देताना आरक्षण बेकायदेशीर ठरवत त्याला अल्ट्रा व्हायर्स असा शब्द वापरला. दुसरीकडे अल्ट्रा व्हायरसचा अर्थ शक्तीशाली विषाणू असा होता.

“पाहिजे तसे निर्णय द्यायला हे पाटीलकी, देशमुखी, राजेशाहीचं राज्य नाही”

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “इंदिरा सहानी या खटल्याचा पुनर्विचार करण्याची गरज नाही हेही सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाने स्पष्ट झालं. म्हणूनच अशोक चव्हाण यांनी मान खाली घालून तमाम खुल्या गुणवतांची माफी मागितली पाहिजे. तुम्ही जातीचे मंत्री नसता राज्यातील सर्वसामान्य सर्व समुहांचे मंत्री असता. म्हणून त्यांनी माफी मागितली पाहिजे. 56 किंवा 52 मोर्चे चालत नाहीत, आरक्षण संविधानाची ताकदच टिकवत असते. आरक्षण मुघलाई पद्धतीने लुटलं जाऊ शकत नाही. हेच सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा ‘डंके की चोटपर’ सांगितलंय. भारतात संविधानाचं राज्य आहे. पाहिजे तसे निर्णय द्यायला हे पाटीलकी, देशमुखी, राजेशाहीचं राज्य नाही. हा पंचायतचा नसून सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आहे.”

“माझ्या किंवा कुटुंबाच्या जीवाला काही झालं तर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि मराठा संघटना जबाबदार राहतील”

“हा खुल्या गुणवतांचा विजय असून 52 मोर्चांचा स्पष्ट पराभव आहे. शरद पवार यांनी शेवटी शेवटी लॉबिंग केल्यासारखं केलं. केंद्र सरकारला भेटू, ऐसा करु, तैसा करु म्हटले. सगळं पुढ्यात गेलं. संविधानाचा विजय झाला. यानंतर माझ्या जीवितास काही झालं, माझ्या मिसेसला आणि माझ्या मुलीला किंवा कुटुंबाला जीवे मारण्यात आलं, तर सुप्रिया सुळे, शरद पवार, मराठा संघटना आणि मराठा आरक्षणासाठी आम्हाला धमक्या देणारे जबाबदार असतील,” असंही सदावर्ते यांनी नमूद केलं.

गुणरत्न सदावर्ते नेमकं काय म्हणाले? व्हिडीओ पाहा…

हेही वाचा :

Maratha Reservation | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा आरक्षणावर राज्यातील जनतेशी संवाद साधणार

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही केंद्राची इच्छा आहे का?; नाना पटोलेंचा सवाल

मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी आठवलेंनी सांगितला ‘हा’ उपाय; पंतप्रधानांना पत्र देणार

Know all about what Adv Gunratna Sadavarte say Ultra Vires or Ultra Virus on Maratha reservation

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.