Sharad Pawar Net Worth : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार किती श्रीमंत आहेत ? जाणून घ्या त्यांची संपत्ती

Sharad Pawar Property : शरद पवार यांच्या कुटुंबानेही शेअर्स, बाँड्स आणि डिबेंचर्समध्ये पैसे गुंतवले आहेत. याशिवाय तीन वर्षांपूर्वी त्यांच्या कुटुंबीयांकडे 88 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने होते.

Sharad Pawar Net Worth : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार किती श्रीमंत आहेत ? जाणून घ्या त्यांची संपत्ती
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 4:53 PM

मुंबई : 82 वर्षांचे शरद पवार (Sharad Pawar) हे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातीलही एक मोठं नाव आहे. देशाच्या राजकारणातील त्यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. 1999 मध्ये त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली आणि स्वत:चा पक्ष स्थापन केला. म्हणजेच गेली 24 वर्षे राष्ट्रवादीची (NCP) कमान शरद पवार यांच्याकडे आहे. मात्र आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद (NCP President) सोडण्याची घोषणा केली आहे.

लोक माझे सांगाती या शरद पवारांच्या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचं आज प्रकाशन झालं. यावेळी शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पाय उतार होण्याची घोषणा केली. मी अध्यक्षपदावरून निवृत्त होतोय, असं शरद पवार म्हणाले.  मात्र त्यांच्या या निर्णयाला पक्षातून विरोध होत असून मोठमोठ्या नेत्यांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही शरद पवारांना त्यांचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.

खरंतर शरद पवार हे 1960 पासून सक्रिय राजकारण करत आहेत. म्हणजेच त्यांनी भारतीय राजकारणाला तब्बल 63 वर्षे दिली आहेत. ते निवृत्त झाल्यानंतर आता पुढे काय घडतंय, पक्षाची जबाबदारी कोणाला मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शरद पवार यांची संपत्ती

63 वर्षांच्या सक्रिय राजकीय प्रवासानंतर शरद पवार यांच्याकडे किती मालमत्ता आहे (Sharad Pawar Net Worth) हे आता जाणून घेऊया. 2020 मध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना शरद पवार यांनी शपथपत्रात दिलेल्या तपशिलानुसार, त्यांच्याकडे सुमारे 32.73 कोटी रुपयांची संपत्ती होती.

2020 साली, शरद पवार यांच्याकडे एकूण 25 कोटी 21 लाख 33 हजार 329 रुपयांची जंगम मालमत्ता आणि 7कोटी 52 लाख 33 हजार 941 रुपयांची स्थावर मालमत्ता होती, जी एकूण 32.73 कोटी रुपये आहे. कर्जाबाबत बोलायचे झाल्यास, निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार शरद पवार यांच्या कुटुंबावर 2020 सालापर्यंत एकूण एक कोटी रुपयांचे कर्ज होते.

शेअर बाजारातही गुंतवणूक

शरद पवार यांच्या कुटुंबीयांनीही शेअर्स, बॉण्ड्स आणि डिबेंचर्समध्ये पैसे गुंतवले आहेत. याशिवाय तीन वर्षांपूर्वी त्यांच्या कुटुंबीयांकडे 88 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने होते. आजच्या घडीला त्यांची किंमत निश्चितच कितीतरी पटीने अधिक असेल.

शरद पवार अनेकदा टोयोटा लँड क्रूझर आणि लक्सस एलएक्स 570 कारमध्ये दिसतात. या दोन्ही अतिशय हायटेक कार आहेत. टोयोटा लँड क्रूझरची सध्याची किंमत सुमारे 1.30 कोटी रुपये आहे. Luxus LX 570 ची किंमत सुमारे 2.40 कोटी रुपये असून, ही एक अतिशय आलिशान कार आहे.

6 वर्षांत इतकी वाढली संपत्ती

दरम्यान 3 वर्षांपूर्वी 2020 मध्ये शरद पवार यांची एकूण संपत्ती 32.73 कोटी रुपये होती, 2014 च्या निवडणुकीत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 वर्षात शरद पवार यांच्या संपत्तीत केवळ 60 लाख रुपयांची वाढ झाली होती. 2014 च्या निवडणुकीत शरद पवार यांनी 20 कोटी 47 लाख 99 हजार 970.41 रुपयांची जंगम मालमत्ता आणि 11,65,16,290 रुपयांची स्थावर मालमत्ता यासह एकूण 32.13 कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली होती.

पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर नेत्यांना अश्रू अनावर

दरम्यान शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते यांना अश्रू अनावर झाले. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी भरल्या डोळ्यांनी शरद पवारांना त्यांचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. शरद पवार यांनी पक्षाचे नेतृत्व करावे. शरद पवार आमच्यासाठी समिती आहेत, तेच आमचे नेते आहेत, असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले. त्यांना जो निर्णय घ्यायचा असेल तो त्यांनी घ्यावा, पण पक्षाध्यक्षपद सोडू नये, अशा शब्दांत भुजबळ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.